CSK VS DC : धोनीच्या नावे लाजीरवाणा चौकार; दिल्ली विरुद्ध दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 10 April 2021

2015 च्या हंगामानंतर पहिल्यांदाच धोनीवर शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात तो चौथ्यांदा शून्यावर बाद झाला.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात आवेश खान याने लक्षवेधी कामगिरी केली. सलामीवीर फाफ ड्युप्लेसीस आणि CSK कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला त्याने खातेही उघडू दिले नाही. आपल्या चार षटकांच्या कोट्यात त्याने 23 धावा खर्च करुन या दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. फाफ ड्युप्लेसीसला आवेशने पायचित केले. तर धोनीला त्याने बोल्ड करुन माघारी धाडले.  इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 14 व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यातील चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या लढतीमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नईची सुरुवात खराब झाली. संघाच्या धावफलकावर अवघ्या 7 धावा असताना सलामीवीर फाफ ड्युप्लेसीस (0)  आणि ऋतूराज गायकवाड (5) माघारी फिरले. रैनाने दमदार कमबॅक करत संघाचा डाव सावरला. मात्र धोनीला हंगामातील पहिल्या सामन्यात विशेष छाप सोडता आली नाही. त्याला आवेश खानने खातेही उघडू दिले नाही.    

CSKvsDC : गब्बरचा जबरदस्त कॅच; ऋतूराजला स्वस्तात धाडलं तंबूत (VIDEO)

 

2015 च्या हंगामानंतर पहिल्यांदाच धोनीवर शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात तो चौथ्यांदा शून्यावर बाद झाला. 2010 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. याच हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तो 2 चेंडूचा सामना करुन शून्यावर बाद झाला होता. 2015 च्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात धोनीला खातेही उघडता आले नव्हते. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध दुसऱ्यांदा त्याच्याव शून्यावर बाद होण्याची वेळ आली.


​ ​

संबंधित बातम्या