IPL 2021 : डेरिंगबाज फाफ; लागोपाठ लगावले रिस्की शॉट (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 19 April 2021

उनादकट घेऊन आलेल्या पाचव्या षटकातील फाफने रिस्की शॉट खेळून अप्रतिम चौकार खेचला.

टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना फाफ ड्युप्लेसीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ऋतूराज गायकवाडने साथ सोडल्यानंतर सलामीवीर फाफच्या भात्यातून अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. लयीत दिसणाऱ्या फाफला क्रिस मॉरिसने आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने 17 चेंडूत 4 चौकार आणि 2 उत्तुंग षटकाराच्या मदतीने 33 धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून त्याने केलेली खेळी सर्वोच्च ठरली. आपल्या खेळीत त्याने लगावलेल्या चार चौकारांपैकी दोन चौकार हे डोळ्याचे पारणे फेडणारे होते. 

 

उनादकट घेऊन आलेल्या पाचव्या षटकातील फाफने रिस्की शॉट खेळून अप्रतिम चौकार खेचला. एवढ्यावरच तो थांबला नाही. दुसऱ्या चेंडूवरही त्याने सेम असाच स्ट्रोक खेळल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या चेंडूवरही तो असचा फटका मारेल, याचा उनादकटने कदाचित विचारही केला नसेल. स्टंपच्या पूर्णपणे आडवे येऊन फाफ ड्युप्लेसीसने विकेट किपरच्या मागे खेळलेला फटका डेअरिंगवाला असाच होता. टी-20 मध्ये अनेकदा आपल्याला हा फटका पाहायला मिळतो.  

CSK चा जुना फोटो व्हायरल होण्यामागचे कारण माहितेय?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात फाफ ड्युप्लेसीला खातेही उघडता आले नव्हते. आवेश खानने त्याची विकेट घेतली होती. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला होता. स्पर्धेतील  दुसऱ्या सामन्यात पंजाबविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने दमदार कमबॅक केले होते. पंजाबचा डाव 106 डावात आटोपून चेन्नईने 6 विकेट राखून सामना खिशात घातला होता. या सामन्यात फाफ ड्युप्लेसीसीने 33 चेंडूत  नाबाद 36 धावा केल्या होत्या.  


​ ​

संबंधित बातम्या