IPL 2021: अली म्हणाला; नो अल्कोहोल लोगो; CSK लगेच झाले 'राजी'

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 4 April 2021

इंग्लंडच्या मोईन अलीशिवाय आदिल रशीदनेही  अशाच प्रकारची भूमिका घेऊन मद्य जाहिरातीपासून दूर ठेवले आहे.

पिवळ्या जर्सीतील नव्या लूकसह चेन्नई सुपर किंग्ज मैदानात उतरणार आहे. या संघाच्या ताफ्यात सहभागी असलेल्या मोईन अलीने संघ व्यवस्थापनाकडे एक खास मागणी केली होती. याची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. आपल्या जर्सीवरील अल्कोहोलचा लोगो हटवण्यात यावा, अशी मागणी इंग्लंच्या अष्टपैलूनं केली होती. चेन्नई सुपर किंग्जच्या संघ व्यवस्थापनाने त्याची मागणी मान्य करुन लोगो हटवण्याचा निर्णय घेतलाय. 

इंग्लंडच्या मोईन अलीशिवाय आदिल रशीदनेही  अशाच प्रकारची भूमिका घेऊन मद्य जाहिरातीपासून दूर ठेवले आहे. संघातील खेळाडू विजयाचा आनंद घेत असताना जेव्हा अल्कोहोलचा उपयोग करतात तेव्हा हे दोन खेळाडू यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हाशिम अमला याने सर्वात पहिल्यांदा अशी भूमिका घेतली होती. त्याची ही मागणी दक्षिण आफ्रिका बोर्डाने मान्यही केली होती.  सीएसकेच्या जर्सीवर एसएनजे 10000 चा लोगो आहे. संघातील इतर खेळाडू या लोगोची जर्सी घालणार असले तरी मोईन अलीच्या जर्सीवर आता हा लोगो दिसणार नाही. त्याच्या जर्सीवरील लोगो  चेन्नई सुपर किंग्जने काढून टाकला आहे.  

अष्टपैलू खेळाडू राजस्थान रॉयल्सला तारणार

चेन्नईच्या संघाने मोईन अलीसाठी 7 कोटी एवढी रक्कम मोजली आहे. तो चेन्नईसाठी कितपत फायदेशीर ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मागीलवर्षी मोईन अली विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून खेळताना पाहायला मिळाले होते. परंतु 2018 पासून मागील वर्षीपासून केवळ 3 सामन्यातच त्याला संधी देण्यात आली. चेन्नईच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात मोईन अलीने चांगलीच फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याची ही झलक यंदाच्या हंगामात ही पाहायला मिळणाक का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या