बंगळूरसमोर आज दिल्लीचे आव्हान

पीटीआय
Tuesday, 27 April 2021

सलग चार विजयानंतर रवींद्र जडेजाच्या अफलातून कामगिरीमुळे पराभव झालेला बंगळूरचा संघ आणि यंदाच्या मोसमातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये विजयी झालेला दिल्लीचा संघ यांच्यात उद्या सामना होत आहे.

अहमदाबाद - सलग चार विजयानंतर रवींद्र जडेजाच्या अफलातून कामगिरीमुळे पराभव झालेला बंगळूरचा संघ आणि यंदाच्या मोसमातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये विजयी झालेला दिल्लीचा संघ यांच्यात उद्या सामना होत आहे. क्रमवारीत दिल्ली आणि बंगळूर अनक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

रविवारी चेन्नईविरुद्ध मुंबईत झालेल्या सामन्यात बंगळूरचे वर्चस्व होते, परंतु अखेरच्या षटकांत जडेजाने अर्षद पटेलविरुद्ध केलेली तुफानी टोलेबाजी आणि त्यानंतर गोलंदाजीत केलेली कमाल यामुळे बंगळूर पिछाडीवर पडले होते. उद्याच्या सामन्यात अशी चुक विराटचा संघ होऊ देणार नाही. या तुलनेत दिल्ली कर्णधार रिषभ पंतला मात्र उद्याच्या सामन्यासाठी बऱ्याच सुधारणा कराव्या लागणार आहे. 

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला चांगली सुरवात मिळाली होती, परंतु त्याचा फायदा मोठी धावसंख्या उभारण्यात झाला नाही. गोलंदाजीतही कागिसो रबाडाचे अपयश चिंता करणारे आहे, मात्र फिरकी गोलंदाजीत अक्षर पटेल आणि अमित मिश्रा चांगले यश मिळवत आहेत. उद्या मात्र विराट कोहली, देवदत्त पदिक्कल, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिल्यर्स यांच्यासमोर त्यांना शर्थ करावी लागेल.

आजचा सामना
दिल्ली वि. बंगळूर प्रतिस्पर्ध्यांत २५ लढती
१० विजय १४
१९६ सर्वोत्तम २१५
९५ नीचांक १३७

खेळपट्टीचा अंदाज - फलंदाजीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर किमान १६० धावा सहज शक्य, मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावा १७१. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा पाचपैकी तीन सामन्यात विजय
हवामानाचा अंदाज - अपेक्षित तपमान ३८ अंश. मात्र उकाड्याचा त्रास नसणार. 
गुणतक्क्यात - दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर; तर बंगळूर तिसऱ्या स्थानी
यंदाच्या स्पर्धेत - दिल्ली तसेच बंगळूरचे पाचपैकी चार सामन्यात विजय
प्रतिस्पर्ध्यातील गेल्या पाच सामन्यात दिल्लीचे चार विजय
गतस्पर्धेतील दोन्ही लढतीत दिल्लीची सरशी
बंगळूरचे १४ पैकी नऊ विजय धावांचा पाठलाग करताना


​ ​

संबंधित बातम्या