कोलकाताच्या दोन लढतींबाबतही प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 May 2021

आयपीएलच्या नियमानुसार एखाद्या संघातील खेळाडू बाधित झाल्यास त्यांना सात दिवस विलगीकरणात जावे लागते. कोलकाताची ३ मे या दिवसाची लढत रद्द झाली आहे, पण ८ मे रोजी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीबाबतही त्यामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे.

आयपीएलच्या नियमानुसार एखाद्या संघातील खेळाडू बाधित झाल्यास त्यांना सात दिवस विलगीकरणात जावे लागते. कोलकाताची ३ मे या दिवसाची लढत रद्द झाली आहे, पण ८ मे रोजी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीबाबतही त्यामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर ९ मे रोजी संघ बंगळूरला प्रयाण करणार होता. या प्रवासाला मनाई झाल्यास १० मे रोजी मुंबईविरुद्ध बंगळूरला होणाऱ्या सामन्यावरही टांगती तलवार असेल.

पाच संघांबाबत गंभीर प्रश्न
आयपीएलच्या संकेतानुसार एखाद्या संघातील खेळाडू बाधित असल्यास त्यांच्या ज्या संघाविरुद्ध गेल्या चौदा दिवसांत लढती झाल्या त्या संघांनाही विलगीकरणात जावे लागते. कोलकाता संघ या कालावधीत दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि चेन्नईविरुद्ध सामने खेळला आहे. आता हे संघ नव्याने विलगीकरणात गेल्यास या संघांच्या लढती होणार नाहीत. या परिस्थितीत ४ मे रोजी होणारा मुंबई हैदराबाद सामना होऊ शकेल, पण त्यानंतरच्या सामन्याबाबत अनिश्चितता असेल.

अनिश्चिततेची टांगती तलवार

  • ३ मे - कोलकाता वि. बंगळूर (लढत लांबणीवर)
  • ४ मे - हैदराबाद वि. मुंबई (प्रतिस्पर्धी बाधित संघाच्या संपर्कात नसल्याने लढत होण्याची शक्यता
  • ५ मे - राजस्थान वि. चेन्नई (दोन्ही संघ कोलकाता संघाच्या संपर्कात)
  • ६ मे - बंगळूर वि. पंजाब (पंजाब संघ संपर्कात)
  • ७ मे - हैदराबाद वि. चेन्नई (चेन्नई संघ संपर्कात)
  • ८ मे - कोलकाता वि. दिल्ली (कोलकाता संघाची विलगीकरणाच्या कालावधीत लढत, त्यामुळे अनिश्चित)
  • ८ मे - राजस्थान वि. मुंबई (राजस्थान संपर्कात)
  • ९ मे - चेन्नई वि. पंजाब (प्रतिस्पर्धी संघ कोलकाताच्या संपर्कात)
  • ९ मे - बंगळूर वि. हैदराबाद (लढतीबाबत सध्या काहीही प्रश्न नाही)
  • १० मे - चेन्नई वि. कोलकाता (कोलकाता संघ विलगीकरण संपवून बंगळूरला येण्याबाबत अनिश्चितता)

​ ​

संबंधित बातम्या