कोलकताविरुद्ध फारच खराब खेळ केला - राहुल

सुनंदन लेले
Wednesday, 28 April 2021

कशाला आढेवेढे घेऊ... स्पष्टच सांगतो, आम्ही फार खराब खेळ केला, अशा शब्दात पंजाब संघाचा कर्णधार के. एल. राहुलने कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आपली नाराजी व्यक्त केली.

कशाला आढेवेढे घेऊ... स्पष्टच सांगतो, आम्ही फार खराब खेळ केला, अशा शब्दात पंजाब संघाचा कर्णधार के. एल. राहुलने कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आपली नाराजी व्यक्त केली.

नवीन मैदानावर सामना खेळायला आल्यावर आम्ही परत गडबडलो, जिथे जुळवून घेणे गरजेचे होते. खेळपट्टी संथ होती चेंडू खाली राहत होता; पण म्हणून १२५ धावांमध्ये बाद होण्यासारखे नक्कीच नव्हते. आम्ही जास्त मन लावून फलंदाजीचे करायला हवी होती. त्यातून आम्ही काही खराब फटके मारून विकेट गमावल्या, ज्याने ३० धावा कमी केल्या गेल्या, असे राहुल म्हणाला.

याच मैदानावर आमचे अजून तीन सामने होणार आहेत. तेव्हा पहिल्या सामन्यात झालेल्या चुका परत करून चालणार नाही; तरीही काही सकारात्मक गोष्टी घडल्या. रवी बिश्णोईचा झेल केवळ प्रेक्षणीय होता. जाँण्टी ऱ्होडसचे प्रशिक्षण मोठे काम करून जात आहे. फक्त चांगल्या क्षेत्ररक्षणाला भक्कम फलंदाजीची जोड मिळायला हवीय, असेही त्याने सांगितले.

पंजाबविरुद्ध सर्वांगीण खेळ केला. कधी गोलंदाजी चांगली झाली, तर कधी फलंदाजी. गोलंदाजांनी प्रभावी मारा केला ज्याला सगळ्यांनी चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ दिली. शिवम मावीने सलग चार षटके मस्त मारा केला, ज्याला प्रसिद्ध कृष्णाने जोड दिली. फलंदाजीत सुरुवातीला काही धक्के लागले; पण नंतर राहुल त्रिपाठीने डाव सावरला. मला गेल्या काही सामन्यात चांगली फलंदाजी करता आली नव्हती, त्याचा विचार करता जम बसल्यावर मी निश्चय केला, की आता काम अर्धवट सोडून जायचे नाही. एकत्रित चांगला सूर मिळाला आहे, अशी भावना कोलकाता कर्णधार मॉर्गनने व्यक्त केली.


​ ​

संबंधित बातम्या