कोलकाता संघात असा झाला कोरोना संसर्गाचा शिरकाव?

पीटीआय
Tuesday, 4 May 2021

दुखावलेल्या खांद्याचे स्कॅन करण्यासाठी वरुण चक्रवर्ती कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी असलेल्या जैवसुरक्षा वातावरणातून बाहेर पडला आणि त्या वेळी त्याला कोरोनाची लागण झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अहमदाबाद - दुखावलेल्या खांद्याचे स्कॅन करण्यासाठी वरुण चक्रवर्ती कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी असलेल्या जैवसुरक्षा वातावरणातून बाहेर पडला आणि त्या वेळी त्याला कोरोनाची लागण झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चकवर्तीने या तपासणीस जाताना ग्रीन चॅनेलचा वापर केला होता. ग्रीन चॅनेलनुसार खेळाडूस वैद्यकीय चाचणीसाठी बाहेर जाणे भाग पडल्यास तो संघाच्याच वाहनातून प्रवास करतो तसेच त्याने पीपीई किट परिधान केलेले असते. चाचणी घेणाऱ्या डॉक्टरांनीही पीपीई किट परिधान करणे आवश्यक असते. यानंतरही चक्रवर्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याच्यामुळेच संदीप वॉरियर हाही बाधित झाला, असेही सूत्रांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच भारतीय मंडळाचे सीओओ हेमांग अमीन यांनी आयपीएल संघातील सर्व खेळाडू जैवसुरक्षित वातावरणात पूर्णपणे सुरक्षित आहेत. स्पर्धा अधिक सुरक्षित होण्यासाठी आता कोरोना चाचणी पाचऐवजी दोन दिवसांतून एकदा होईल असे सांगितले होते.

दरम्यान, कोलकाता संघाची यापूर्वीची लढत दिल्लीविरुद्ध झाली होती. दिल्ली संघातील सर्व खेळाडू चाचणीत निगेटिव्ह आले आहेत. दिल्लीची लढत पंजाबविरुद्ध झाली होती. तेही चाचणीत निगेटिव्ह आले आहेत, असे सांगितले जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या