बंगळूरची कामगिरी पुन्हा ऊंचावणार?

पीटीआय
Monday, 3 May 2021

घसरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला नमवून गाडी आयपीएल ट्वेंटी २० क्रिकेटमध्ये रुळावर आणण्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा प्रयत्न असेल.

अहमदाबाद - घसरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला नमवून गाडी आयपीएल ट्वेंटी २० क्रिकेटमध्ये रुळावर आणण्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा प्रयत्न असेल.. 

काही दिवसांपूर्वी गुणतक्त्यातील अव्वल बंगळूर तीन सामन्यांतील दोन पराभवांने तिसऱ्या क्रमांकावर घसरले. बंगळूरने ताकदवान फलंदाजीच्या जोरावर कोलकात्यावरील वर्चस्वाचे लक्ष्य बाळगले आहे.  विराट कोहली, एबी डिव्हिल्यर्स तसेच ग्लेन मॅक्सवेल हे कसलेले फलंदाज बंगळूर संघात आहेत,पण देवदत्त पदीक्कल बहारदार शतकानंतर अपयशीच ठरला आहे.

इऑन मॉर्गनच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता संघाने चांगली सुरुवात केली, पण पाच सामने गमावले. 

शुभमन गिल, राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा भक्कम सुरुवात करून देण्यास अपयशी ठरले. फलंदाजांच्या अपयशानंतरही त्यांनी  करुण नायरला संधी देणे टाळले आहे. त्याचा ट्वेंटी २० मधील स्ट्राईक रेट १५५.४० आहे तसेच त्याने दोन शतके केली आहेत. त्याचबरोबर वेंकटेश अय्यरला संधी देण्याचा विचारही होत आहे. सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्तीची आठ षटके कोहली तसेच त्याच्या सहकाऱ्यांसाठी आव्हान ठरतील आणि किंबहुना याच षटकात लढतीचा निर्णयही होऊ शकेल.

आजचा सामना
बंगळूर वि. कोलकाता प्रतिस्पर्ध्यांत २८ लढती
१३ विजय १५
२१३ सर्वोत्तम २२२
४९ नीचांक ८४

  • गुणतक्त्यात - बंगळूर तिसरे; तर कोलकता सहाव्या स्थानी
  • खेळपट्टीचा अंदाज - फलंदाजीस साथ; मध्यमगती गोलंदाजांचा धोका अपेक्षित
  • हवामानाचा अंदाज - अपेक्षित तपमान ३८ अंश. दवाचेही आव्हान अपेक्षित
  • यंदाच्या स्पर्धेत - बंगळूरचा सातपैकी पाच सामन्यात विजय, तर कोलकाताची दोन सामन्यात सरशी
  • प्रतिस्पर्ध्यातील गेल्या पाच सामन्यात बंगळूरचे चार विजय
  • यंदाच्या स्पर्धेतील दोघातील पहिली लढत जिंकून बंगळूरने विजयाची हॅट््ट्रीक साधली होती
  • बंगळूरचे १३ पैकी १० विजय धावांचा पाठलाग करताना
  • कोलकताचे १५ पैकी सात विजय प्रथम फलंदाजी करताना

​ ​

संबंधित बातम्या