पराभव झाला तरी संघाचा अभिमान - रिकी पाँटिंग

सुनंदन लेले
Thursday, 29 April 2021

एबी डिव्हिलियर्स फारच दर्जेदार फलंदाज आहे, यात शंका नाही; पण त्याने एकट्याने सामना फिरवला, असे मला म्हणता येणार नाही. कारण आम्ही सामना फक्त एका धावेने गमावला.

एबी डिव्हिलियर्स फारच दर्जेदार फलंदाज आहे, यात शंका नाही; पण त्याने एकट्याने सामना फिरवला, असे मला म्हणता येणार नाही. कारण आम्ही सामना फक्त एका धावेने गमावला. सामना आमच्यापासून लांब गेला असताना हेटमायरने सुंदर खेळी सादर केली. विजय हाती लागला नाही, तरी संघाने ज्या प्रकारे लढा दिला त्याचा मला अभिमान आहे, असे मत दिल्ली संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केले.

एका एका धावेचे महत्त्व किती असते, हे अशा सामन्यातून शिकायला मिळते. गेल्या सामन्यात आम्ही पहिल्यांदा सामना बरोबरीत नेला आणि मग सुपर ओव्हर खेळून विजय मिळवला. यातून खेळाडू बरेच काही शिकणार आहेत. रिषभ पंत अत्यंत स्वाभिमानी खेळाडू आहे. त्याला कठीण प्रसंगात मैदानात जाऊन संघाकरता चांगली कामगिरी करायची इच्छा असते. प्रत्येक सामन्यानंतर रिषभ पंत अजून प्रगल्भ होतोय. हे मी शंभर टक्के सांगू शकतो, असेही पाँटिंग यांनी सांगितले.

बंगळूरविरुद्धच्या सामन्यातील पराभवाची जास्त चर्चा आम्ही करत बसणार नाही. आमचा एक चांगला खेळाडू अश्विनच्या कुटुंबीयांना कोव्हिडची लागण झाल्याने तो स्पर्धा सोडून गेला आहे म्हणून कोव्हिड संकटाची धग आम्हाला जास्त जाणवत आहे, असे रिकी पाँटिंग म्हणाले

शिस्तची फायदा - डिव्हि्यर्स
आयपीएल अगोदर मी जास्त क्रिकेट सामने खेळलो नव्हतो. एक नक्की आहे, की खेळत नसलो, तरी मी व्यायामावरचे लक्ष कधीच दूर करत नाही. तंदुरुस्ती राखण्याकरिता मी प्रामाणिक प्रयत्न करतो. मी म्हणेन की खेळत नसताना पाळलेली शिस्त कामी येते. दिल्ली संघ मजबूत आहे. त्यांची गोलंदाजी दर्जेदार आहे. कागिसो रबाडाला मिडविकेटवरून मारलेला षटकार मला आवडला. कारण रबाडा खूपच अफलातून गोलंदाज आहे. तो कधीच फलंदाजाला सहजी मारून देत नाही, असे सामन्यात निर्णायक खेळी करणाऱ्या बंगळूच्या एबी डिव्हिल्यर्सने सांगितले.

आजचा सामना
दिल्ली वि. कोलकता प्रतिस्पर्ध्यांत २६ लढती
१२ विजय १४
२२८ सर्वोत्तम २१०
९८ नीचांक ९७

  • खेळपट्टीचा अंदाज - फलंदाजांपैकी वेगवान गोलंदाजीस साथ देण्याची शक्यता. धावांचा पाठलाग फायदेशीर
  • हवामानाचा अंदाज - लढतीच्यावेळी तपमान ४० अंशाच्या आसपास. आर्द्रतेचा त्रास नाही, पण दव सतावण्याची शक्यता
  • गुणतक्त्यात - दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर तर कोलकता पाचव्या क्रमांकावर
  • यंदाच्या स्पर्धेत - दिल्लीचे सहापैकी चार सामन्यात विजय, तर कोलकताचे सहा सामन्यात दोन विजय
  • प्रतिस्पर्ध्यातील गेल्या पाच लढतीत दिल्लीचे तीन विजय, तर कोलकताचे दोन
  • गतस्पर्धेत प्रतिस्पर्ध्यातील लढतीत प्रत्येकाचा एक विजय (वेळ - रात्री ७.३० पासून)

​ ​

संबंधित बातम्या