धोनीच्या संघाला रोखणे हैदराबादला सोपे नाही

पीटीआय
Wednesday, 28 April 2021

रवींद्र जडेजाच्या एका तुफानी कामगिरीमुळे चेन्नई एक्स्प्रेस जोमाने धावू लागलेल्या धोनीच्या संघाला रोखणे हैदराबादला सोपे असणार नाही. हैदराबादचा संघ तळाला आहे तर चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली - रवींद्र जडेजाच्या एका तुफानी कामगिरीमुळे चेन्नई एक्स्प्रेस जोमाने धावू लागलेल्या धोनीच्या संघाला रोखणे हैदराबादला सोपे असणार नाही. हैदराबादचा संघ तळाला आहे तर चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे.

यंदाच्या स्पर्धेत हैदराबादसाठी सर्वच गोष्टी विरोधात जात आहेत त्यात बलाढ्य संघाशी सामना करताना शर्थ करावी लागणार आहे. हैदराबादने पाचपैकी चार सामने गमावले ते त्यांच्याच चुकांमुळे. दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांचा सुपरओव्हरमध्ये पराभव झाला होता. सर्वात फॉर्मात असलेल्या बेअरस्टॉचा त्यांच्याकडून व्यवस्थित वापर केला जात नाही. 

मधल्या फळीतील अपयश हैदराबाद संघाच्या मुळावर येत आहे. तर गोलंदाजीत केवळ रशीद खानवर त्यांची मदार आहे. इतर गोलंदाजही निराशा करत आहेत अशा परिस्थितीत चेन्नईच्या फलंदाजांना रोखणे कठीण जाईल. जडेजाने चेन्नई संघात वेगळाच आत्मविश्वास भरला आहे. विशेष म्हणजे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही तो निर्णायक कामगिरी करत आहे.

आजचा सामना
चेन्नई वि. हैदराबाद प्रतिस्पर्ध्यांत १४ लढती
११ विजय ४
२२३ सर्वोत्तम १९२
१३२ नीचांक १३९

  • खेळपट्टीचा अंदाज - प्रामुख्याने फलंदाजी तसेच गोलंदाजांना समान साथ देण्याचा खेळपट्टीचा लौकिक. दोन वर्षांपूर्वीच्या स्पर्धेत धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा चारपैकी सहा सामन्यांत विजय
  • हवामानाचा अंदाज - जास्तीचे तपमान ३७ अंश. आकाश चांगलेच ढगाळलेले, पण पावसाची शक्यता नाही. उकाडा कस पाहण्याची शक्यता कमी
  • गुणतक्त्यातील स्थिती - चेन्नई अव्वल स्थानी, तर हैदराबाद तळाला.
  • यंदाच्या स्पर्धेत - चेन्नईचे पाच सामन्यांत चार विजय; तर हैदराबादचे पाच सामन्यांत चार पराभव
  • प्रतिस्पर्ध्यांतील गेल्या पाच लढतीत चेन्नईचे तीन, तर हैदराबादचे दोन विजय
  • गतस्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांचा प्रत्येकी एक विजय

​ ​

संबंधित बातम्या