IPL 2021: यंदा गेलवर सुरुवातीपासूनच दिसणार 'प्रिती'

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 6 April 2021

युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत पहिल्या हाफमध्ये कॅरेबियन गड्याला बाकावर बसवण्यात आले होते.

आयपीएल स्पर्धेतील पहिल्या जेतेपदासाठी आतुर असलेल्या पंजाबने  नाव आणि जर्सीसह  गेम प्लॅनही बदलला आहे. युएईतील आयपीएल स्पर्धेत झालेल्या चुका टाळून संघ मैदानातत उतरणार आहे. आगामी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर  बॅटिंगमधील मोठ्या गेम प्लॅनची माहिती पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) फलंदाजी कोच असलेल्या वासीम जाफर यांनी दिलीये. यंदाच्या हंगामात ख्रिस गेल हा सुरुवातीपासून प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पंजाबाच्या ताफ्यातील कॅरेबियन ख्रिस गेलवर सुरुवातीपासून प्रिती दिसणार असेच म्हणावे लागेल. 

पंजाबच्या संघाने नेतृत्व बदलानंतर संघाचे नाव आणि नव्या जर्सीसह मैदानात उतरण्याची तयारी केली. संघाला पहिले वहिले जेतेपद मिळवून देण्यासाठी ख्रिस गेल महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतो. आगामी स्पर्धेच्या रणनितीवर वासीम जाफर म्हणाले की, ताफ्यातील स्फोटक फलंदाज असलेल्या ख्रिस गेल याला सुरुवातीपासून संधी देण्यात येईल. 

IPL 2021 : पंतचा ट्रेलर पाहिला; रेकॉर्डचा पिक्चर अभी बाकी है दोस्त!

युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत पहिल्या हाफमध्ये कॅरेबियन गड्याला बाकावर बसवण्यात आले होते. ज्यावेळी त्याला संघात घेतले त्यावेळी त्याने आपल्यातील क्षमता दाखवून दिली होती. यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून गेलला संधी मिळणार असली तरी डावाची सुरुवात करण्याची मोठी जबाबदारी ही कर्णधार केएल राहुल  (KL Rahul) आणि मयांक अग्रवाल (Mayak Agarwal) या जोडीवरच असेल, असेही जाफर यांनी स्पष्ट केले आहे. 

IPL 2021 : गुणवत्तेला न्याय देणार का?

वासीम जाफरने इनसाइड स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये संघाच्या गेम प्लॅनसंदर्भात माहिती दिली. मागील हंगामात केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे गेलला संघात स्थान देण्यात आले नव्हते. तिसऱ्या क्रमांकावर तो सूट होईल का? याबाबत टीम व्यवस्थापनामध्ये शंका होती. पण त्याने तिसऱ्या क्रमांकावर येऊन आपली जबाबदारी चोख पार पाडली. त्यामुळे यंदा त्याला  तिसऱ्या क्रमांकावर संधी देण्याचा प्लॅन आखल्याचे त्यांनी सांगितले. 
 


​ ​

संबंधित बातम्या