पदार्पणाच्या सामन्यात चेतन सकारियाने घेतला अफलातून झेल, निकोलस पुरनला शून्यावर पाठवलं माघारी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 April 2021

IPL 2021 : चेतन यानं घेतलेला झेल पाहून वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस याला विश्वासच बसला नाही

 
IPL 2021 : सोमवारी झालेल्या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा ४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार राहुलच्या ९१ धावांच्या खेळीच्या बळावर पंजाबनं निर्धारित २० षटकांत २२१ धवांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार संजू सॅमसन याच्या शतकानंतरही राजस्थानला ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधलं ते युवा चेतन सकारिया यानं. आधी गोलंदाजी करताना सर्वांना प्रभावीत केले. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना धोकादायक पुरनचा अफलातून झेल घेत सर्वांना आवाक केलं. 

१८ व्या षटकात फाइन लेगला उभा असलेल्या चेतन सकारियानं धोकादायक फलंदाज निकोलस पूरन याचा हवेत झेपावत अफलातून झेल घेतला. चेतनच्या अफलातून झेलमुळे विंडिजच्या या घातक फलंदाजाता धावांचं खातेही उघडता आलं नाही.  चेतननं घेतलेल्या अफलातून झेलची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस याला विश्वासच बसला नाही. (हेही वाचा ; यूनिवर्स बॉसचा षटकारांचा विक्रम; रोहित-धोनी आसपासही नाहीत)

पाहा व्हिडिओ -

Brought to you by

चेतन सकारियानं आपल्या गोलंदाजीनं सर्वांनाच प्रभावीत केलं. आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या चेतन यानं ४ षटकात ३१ धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.  

संजूचं शतक व्यर्थ, राजस्थानचा ४ धावांनी पराभव
वानखेडेच्या मैदानात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या 200 पारच्या लढाईत अखेर पंजाबाने बाजी मारली. धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने विक्रमी शतक केले. पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावा हव्या असताना अर्शदीपच्या गोलंदाजीवर संजू झेलबाद झाला. त्याने 63 चेंडूत 119 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. 222 धावांचे टार्गेट चेस करताना राजस्थानचा संघ निर्धारित 20 षटकात 7 बाद 217 धावांपर्यंत मजल मारु शकला. यंदाच्या हंगामात नाव आणि नव्या जर्सीसह मैदानात उतरलेल्या पंजाबने 4 धावांनी सामना खिशात घातला. 


​ ​

संबंधित बातम्या