IPL 2021 : ट्रक ड्रायव्हरच्या पोराची धमाकेदार एन्ट्री

सकाळ स्पोर्ट्स
Monday, 12 April 2021

ऐकेकाळी त्याचे वडिल ट्रक चालवायचे. काही काळानंतर त्यांनी गुजरातमधील वरतेजमध्ये टेम्पो चालवण्याचे कामही केले.

आयपीएलच्या 14 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील नवोदित ताऱ्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. डावखुऱ्या हाताने जलदगती गोलंदाज चेतन सकारियाने मिळालेल्या संधीच सोनं करुन देत संघाला पहिलं यश मिळवून दिले. मयांकच्या रुपात त्याने आपल्या पहिल्या सामन्यात पहिली विकेट घेतली.  देशांतर्गत क्रिकेटमधील लक्षवेधी कामगिरी आणि त्याच्या आयपीएलपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. 

आयपीएलच्या लिलावात 20 लाख मूळ किंमत असलेल्या सकारियाला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी राजस्थानच्या संघाने 1.2 कोटी रुपये मोजले होते. आयपीएलच्या लिलावात मोठी रक्कम मिळाल्याने तो चांगलाच चर्चेत आला होता. एका मुलाखतीमध्ये त्याने आपले वडिल ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगितले होते. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर आयपीएलचे दरवाजे खुले झाल्याचा उल्लेखही त्याने खास मुलाखतीवेळी केला होता. 

CSK चा पराभव का झाला? सुरेश रैनानं दिलं स्पष्टीकरण
 
वडील ट्रक चालवायचे

ऐकेकाळी त्याचे वडिल ट्रक चालवायचे. काही काळानंतर त्यांनी गुजरातमधील वरतेजमध्ये टेम्पो चालवण्याचे कामही केले. कुटुंबियांची अर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळ क्रिकेटचे साहित्य खरेदी करण्यासाठी चेतनकडे पैसे नसायचे. टीम सहकारी असलेल्या शेल्डन जॅकसनने यावेळी त्याची मदत केली. भावसिंहजी क्रिकेट अकादमीने फी माफ केल्यामुळे क्रिकेटर होण्याचे स्वप्न पुर्ण झाले, असेही त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.  

हॉट मॉडेलच्या गराड्यात गेल; व्हिडिओला मिळतोय तुफान प्रतिसाद

जडेजाचा सल्ला आणि आयपीएलमध्ये एन्ट्री 

डाव्या हाताने जलदगती गोलंदाजी करणारा चेतन देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करतो. टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व करणारा रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा आणि जयदेव उनादकट देखील याच संघाकडून खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटच्या पदार्पणातील सामन्यात ड्रेसिंग रुममधून मैदानात येत जडेजाने मदत केली होती, असा किस्साही त्याने शेअर केला होता. जडेजामुळे देशांतर्गत क्रिकेट ते आयपीएल प्रवास शक्य झाला, असेही चेतनने सांगितले होते. 

पहिल्या सामन्यात लक्षवेधी कामगिरी

पदार्पणाच्या सामन्यात चेतन सकारिया याने तीन विकेट घेतल्या. यात सलामीवीर मयंक अगरवाल (14) आणि शतकाच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या लोकेश राहुलचा समावेश आहे. 50 धावांत 91 धावा कुटणाऱ्या लोकेशला त्याने अखेरच्या षटकात बाद केले. रिचर्डनला त्याने खातेही उघडू दिले नाही. आपल्या चार षटकांच्या कोट्यात सकारियाने 31 धावा खर्च करुन तीन विकेट घेतल्या. पदार्पणातील ही कामगिरी लक्षवेधी अशीच आहे. 


​ ​

संबंधित बातम्या