IPL मध्ये विराट नव्हे शिखर धवन आहे 'चेज मास्‍टर'; आकडे पाहून चकित व्हाल

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 19 April 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला  'चेज मास्‍टर' म्हणून ओळखलं जातं. मात्र, आयपीएलमध्ये विराट कोहलीचं नाव दूर दूर पर्यंत दिसत नाही.

पंजाब किंग्जने दिलेल्या 196 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सनेही दिमाखात सुरुवात केली. सलामीवीर पृथ्वी शॉ 17 चेंडूत 32 धावा करुन परतल्यानंतर अनुभवी शिखर धवनने आपल्या भात्यातून सुरेख फटकेबाजी करत संघासाठी उपयुक्त खेळी केली. पण नव्वदीच्या घरात असताना रिचर्डसनने त्याला बोल्ड केलं. धवनचे आयपीएलमधील तिसरे शतक 8 धावांनी हुकले. त्याने 49 चेंडूत 92 धावा केल्या. यात 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. शिखर धवनच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर दिल्लीनं हा सामना 10 चेंडू आणि सहा गडी राखून जिंकला. शिखर धवनचं शतक जरी हुकलं असले तरी मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला  'चेज मास्‍टर' म्हणून ओळखलं जातं. मात्र, आयपीएलमध्ये विराट कोहलीचं नाव दूर दूर पर्यंत दिसत नाही. आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी 'चेज मास्‍टर' म्हणून शिखर धवन याचं घेतलं जातं. शिखर धवनबद्दल आकडेवारी सर्वाकाही बोलून जाते. लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक अर्धशतक आता शिखर धवनच्या नावावर आहेत. शिखर धवन यानं गौतम गंभीरची बरोबरी केली आहे. गंभीर आणि शिखर यांच्या नावावर प्रत्येकी 18-18 अर्धशतकं आहेत. 

आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना 50 पेक्षा अधिक धावसंख्या -

18 - धवन 
18 - गंभीर 
17 - वार्नर 
13 - वॉटसन 
12 - गेल, रैना, रोहित

आयपीएलमध्ये अखेरच्या चार सामन्यात धावांचा पाठलाग करताना धवनची कामगिरी - 

101* विरुद्ध चेन्नई, 2020
54 विरुद्ध बेंगळुरु, 2020
85 विरुद्ध चेन्नई, 2021
92 विरुद्ध पंजाब, 2021

2018 नंतर आयपीएलमध्ये सामनाविर पुरस्कार मिळवणारे खेळाडू - 

9 - एबी डिव्हिलियर्स
8 - शिखर धवन
7 - केएल राहुल
6 - राशिद खान
6 - वॉटसन


​ ​

संबंधित बातम्या