IPL 2021 : पाकिस्तानला ठेंगा दाखवत आफ्रिकेचे गडी भारताच्या दिशेनं

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 5 April 2021

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली  पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे.

पाकिस्तान विरुद्ध घरच्या मैदानात सुरु असलेली मालिका सोडून दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेला पंसती दिली आहे. राष्ट्रीय संघाची साथ सोडून दक्षिण आफ्रिकेचे पाच खेळाडू भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत. यात क्विंटन डिकॉक, कगिसो रबाडा, एनरिच नोर्तजे, लुंगी निगडी आणि डेविड मिलर या मोठ्या नावाचा समावेश आहे. जोहन्सबर्गच्या वनडे सामन्यात या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिका संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. 

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली  पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दोन वनडे सामन्यातील मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला असून मालिका बरोबरीत आहे. सेंच्युरियनच्या मैदानात मालिकेतील निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेला आपल्या प्रमुख गड्यांच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावे लागेल. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात 4 सामन्यांची टी-20 मालिकाही नियोजित आहे.  पाचही खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने आयपीएलमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.  

क्रिकेटच्या मैदानातील वर्ल्ड रेकॉर्ड; जे पुरुषांना जमलं नाही ते महिलांनी करुन दाखवलं

आयपीएल मिशनसाठी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात येत आहेत, अशी माहिती फ्रेंचायझी संघाने अधिकृत ट्विट करुन दिली आहे. कगिसो रबाडा आणि नोर्तजे दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार असून दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन या दोघांचा फोटो शेअर केलाय.  ‘रबाडा आणि नोर्तजे आयपीएलसाठी भारतात यायला निघाले आहेत, या कॅप्शनसह हा फोटो शेअर करण्यात आलाय.  डेविड मिलरने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन भारतात येत असल्याची माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत एप्रिलची चांगली सुरुवात केल्यानंतर आता राजस्थान रॉयल्सकडून खेळण्यासाठी तयार आहे, या कॅप्शनसह त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.  


​ ​

संबंधित बातम्या