प्रॅक्टिस पँन्ट घालून केली फिफ्टी, कोच म्हणाले मार्केटिंग वाल्यांचाही विचार कर...

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 17 October 2020

पुढच्या वेळी सामन्यासाठी खेळायला जाताना प्रॅक्टिस कपड्यांवर जाऊ नकोस नाहीतर मार्केटिंग वाले नाराज होतील, असे मजेशीर भाष्य प्रशिक्षकांनी केले.

मुंबई इंडियन्सचा विकेट किपर आणि फलंदाज क्विंटन डिकॉकनं शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात झंजावत अर्धशतक झळकावले. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने सामना एकहाती जिंकला. या सामन्यात क्विंटन डिकॉक प्रॅक्टिससाठी वापरत असलेली पॅन्ट घालून आला होता. सामन्यानंतर संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधले.  

पुढच्या वेळी सामन्यासाठी खेळायला जाताना प्रॅक्टिस कपड्यांवर जाऊ नकोस नाहीतर मार्केटिंग वाले नाराज होतील, असे मजेशीर भाष्य प्रशिक्षकांनी केले. मुंबई इंडियन्सन ड्रेसिंग रूममधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जयवर्धने डिकॉकला पुन्हा असं करु नकोस, असे सांगताना दिसते.  

या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 8 विकेट्सनी पराभूत केले होते. डिकॉकने आयपीएलमधील आपले 13 वे अर्धशतक झळकावले होते. त्याने  44 चेंडूत 78 धावा केल्या होत्या. धमाकेदार खेळीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 149 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य  मुंबई इंडियन्सने 16.5 षटकात पार केले.  डिकॉक शिवाय कर्णधार रोहित शर्माने 35 धावा केल्या तर हार्दिक पांड्याने 21 धावांचे योगदान दिले.  

IPL 2020: एबीच्या षटकारानं RCB चा विजय; RR 'स्मित' हास्याला मुकलं
 
डिकॉकने आपल्या खेळीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले होते की, या सामन्यासाठी आम्ही कोणतही खास रणनिती आखली नव्हती.  आमच्या संघाची ताकद आम्हाला माहित आहे. संघ अनुभवी असून मैदानात क्षमता दाखवून देण्याची गरज आहे. मुंबई इंडियन्सने संघ प्ले ऑफमधील आपले स्थान जवळपास भक्कम केले आहे. मात्र याची आम्ही सध्या कोणतीही तयारी सुरु केलेली नाही, असेही डिकॉकने म्हटले होते.   


​ ​

संबंधित बातम्या