MIvsKXIP : हार्दिकचा नव्या लूकची चर्चा तर होणारच!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 18 October 2020

हार्दिक पांड्या यंदाच्या स्पर्धेत आठ पैकी आठ सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग राहिला आहे.

युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलमध्ये खेळाडूंचे नवे लुक चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद सोडलेल्या दिनेश कार्तिकच्या नव्या लुकची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात पश्चिम पाठक नावाचे अंपायर हटक्या हेयर स्टायलमध्ये मैदानात उतरल्याची चर्चा सुरु असताना हार्दिक पांड्याचा नवा लूक समोर आला आहे. 

IPL 2020 : अंपायरच्या लुक्सवरून सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

दुबईच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना रंगणार आहे. सुपर संडेच्या डबल हेडरमधील या दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरताना हार्दिक पांड्यांचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या अधिकृत अकाउंटवरुन दुबईच्या मैदानात दाखल होत असतानाचा हार्दिक पांड्याचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये पांड्या आंद्रे रसेलशी मिळती जुळती हेअर स्टाईलमध्ये दिसतोय. 

हार्दिक पांड्या यंदाच्या स्पर्धेत आठ पैकी आठ सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग राहिला आहे. त्याच्या नावे यंदाच्या हंगामात 156 धावा आहेत. अष्टपैलू हार्दिक पांड्याला गोलंदाजीमध्ये अद्याप फारसी चमक दाखवता आलेली नाही. त्याच्या खात्यात अद्याप एकही विकेट नाही. 


​ ​

संबंधित बातम्या