IPL 2020 : पोलार्ड डेथ ओव्हर्समधील डेंजरस बॅट्समन

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 18 October 2020

केरॉन पोलार्ड 7 डावातील 6 वेळा नाबाद परतला आहे. डेथ ओव्हर्समध्ये संघाचा डाव सावरण्याची महत्त्वपूर्ण भूमिका तो चोख पार पाडताना दिसतोय.

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांसमोर मुंबई इंडियन्सची आघाडी कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळाले. पण आघाडी कोलमडल्यानंतर पुन्हा कसे सावरायचे असते याचा नमुना लोअर ऑर्डरला खेळायला आलेल्या मुंबईकरांना दाखवून दिला. पोलार्ड आणि कुल्टर नील या दोघांना अखेरच्या 5 षटकात 62 धावा कुटल्या. 

सीमारेषेवर फर्ग्युसन-गिलमध्ये दिसला कमालीचा ताळमेळ

पोलार्डने पंजाब विरुद्धच्या सामन्यात 12 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीनं 34 धावा केल्या. 283.33 च्या स्ट्राइक रेटनं त्यानं केलेल्या धावा आणि कुल्टर नीलनं 12 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीनं  24 धावा करुन दिलेली साथ यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाने पंजाबसमोर सन्मानजनक धावसंख्या उभारली. या जोडीनं अखेरच्या 27 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. दोघेही नाबाद परतले.  

IPL 2020 : अंपायरच्या लुक्सवरून सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

केरॉन पोलार्ड 7 डावातील 6 वेळा नाबाद परतला आहे. डेथ ओव्हर्समध्ये संघाचा डाव सावरण्याची महत्त्वपूर्ण भूमिका तो चोख पार पाडताना दिसतोय. पोलार्डने 9 सामन्यातील 7 डावात एक अर्धशतकासह 208 धावा केल्या आहेत. नाबाद 60 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. आपल्या खेळीत त्याने 10 चौकार आणि 17 षटकार खेचले आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या