IPL 2020 : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्ससोबत दुबईत कसा?

सुशांत जाधव
Tuesday, 15 September 2020

मुंबई इंडियन्सचा खेळाडू राहुल चाहरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबत अर्जुन तेंडुलकरही स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे.  अर्जुन तेंडुलकरनेही आपल्या वैयक्तिक सोशल अकाउंटवरुन हा फोटो शेअर केलाय.

दुबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि अष्टपैलू क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झालाय का? त्याला मुंबई इंडियन्सकडून दुबईत रंगणाऱ्या सामन्यात संधी दिली जाणार आहे का? अशी चर्चाही सोशल मीडिवर रंगताना दिसत आहे. आयपीएल स्पर्धेसाठी दुबईत असलेल्या मुंबई इंडियन्स संघासोबत त्याचे (Arjun Tendulkar) काही फोटो व्हायरल होत आहेत. यावरुनच सचिनचा मुलगा मुबंईच्या ताफ्यात दिसणार का या चर्चेला उधाण आले आहे.  

IPL 2020 : हिटमॅननंतर धोनीच्या भात्यातून उत्तुंग फटका (Video)

मुंबई इंडियन्सचा खेळाडू राहुल चाहरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबत अर्जुन तेंडुलकरही स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे.  अर्जुन तेंडुलकरनेही आपल्या वैयक्तिक सोशल अकाउंटवरुन हा फोटो शेअर केलाय. यात राहुल चाहर, जेम्स पॅटिंसन, युद्धवीर चरक, मोहसिन खान आणि ट्रेंट बोल्ट यांच्यासोबत दिसतोय. फक्त फोटोच नाही तर अर्जुन तेंडुलकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ देखील शेअर केलाय. यात तो मुंबई इंडियन्सच्या संघातील दिग्गज्जांसोबत दिसते. अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघासोत दिसण्याची ही पहिली वेळ नाही. सचिन तेंडुलकर सलग्नित असलेल्या संघासोबत यापूर्वीही तो संघासोबत दिसला आहे. सध्याच्या घडीला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलमधील सहभागी संघ जैविक सुरक्षिततेत असताना अर्जुन संघासोबत असणे यामुळे चर्चेला वाव मिळत आहे.  

हिटमॅनने मारलेला सिक्स आदळला चालत्या बसवर ; एकदा पहाच

युएईमध्ये काय करतोय अर्जुन 
अर्जुन तेंडुलकर युएईमध्ये टीमसोबत असल्याचे समजते. संघाच्या सराव सत्रामध्ये खेळाडू त्याच्या गोलंदाजीवर सराव देखील करतात. मुंबई इंडियन्सने नेट प्रक्टिससाठी काही मर्यादित गोलंदाजांना संघासोबत नेले आहे. अर्जुन तेंडुलकर त्यापैकी एक आहे.  2018 मध्ये अर्जुन तेंडुलकरने 19 वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. याशिवाय इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय महिला संघातील खेळाडूंनाही नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला होता.  


​ ​

संबंधित बातम्या