IPL 2020 : सलामीच्या लढतीपूर्वी रोहित-धोनीनं घेतला गल्ली क्रिकेटचा आनंद (Video)

सुशांत जाधव
Tuesday, 15 September 2020

विवोच्या स्पॉन्सरशिपला स्थगिती दिल्यानंतर ड्रीम इलेव्हनने स्पर्धेत स्पॉन्सरशिप मिळवली आहे. त्यांनी आपल्या एका जाहिरातीसाठी एक खास व्हिडिओ तयार केलाय. यामध्ये स्टार क्रिकेटर्स गल्ली क्रिकेट खेळताना दाखवण्यात आले आहे.  

दुबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडलेली भारतातील आयपीएल ही लोकप्रिया क्रिकेट लीग 19 सप्टेंबरपासून युएईच्या मैदानात सुरु होत आहे. स्पर्धेत सहभागी झालेले संघ नेटमध्ये कसून सराव करतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. नेटमध्ये  'जंटलमन्स खेळी' करणाऱ्या गड्यांचा गल्ली क्रिकेटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. शिखर धवनच्या सोशल मीडिया अकाउंटसह यंदाच्या स्पर्धेतील स्पॉन्सर असलेल्या ड्रीम इलेव्हनच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हा खास व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.

IPL 2020 : हिटमॅननंतर धोनीच्या भात्यातून उत्तुंग फटका (Video)

या व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मासह अन्य काही खेळाडू गल्ली क्रिकेटचा अनुभव घेताना पाहायला मिळते. विवोच्या स्पॉन्सरशिपला स्थगिती दिल्यानंतर ड्रीम इलेव्हनने स्पर्धेत स्पॉन्सरशिप मिळवली आहे. त्यांनी आपल्या एका जाहिरातीसाठी एक खास व्हिडिओ तयार केलाय. यामध्ये स्टार क्रिकेटर्स गल्ली क्रिकेट खेळताना दाखवण्यात आले आहे.  

हिटमॅनने मारलेला सिक्स आदळला चालत्या बसवर ; एकदा पहाच

ड्रीम इलेव्हनने टी-20 लीगला सुरुवात होण्यापूर्वी तयार केलेल्या पहिल्या जाहिरातीमध्ये  महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत हे खेळाडू झळकले आहेत. कोणताही खेळाडू कितीही मोठा असो गल्ली क्रिकेटमध्ये सर्वांसाठी नियम सारखे असतात, असा उल्लेख असलेल्या कॅप्शनसह  ड्रीम इलेव्हनने हा व्हिडिओ शेअर केलाय.  


​ ​

संबंधित बातम्या