धोनी सोडणार चेन्नईचं कर्णधारपद? परदेशी खेळाडुला मिळणार संधी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी आतापर्यंतच्या कारकिर्दीतील निराशाजनक कामगिरी होती. पहिल्यांदाच धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाला प्लेऑफमध्ये जागा मिळवता आली नाही.

नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी आतापर्यंतच्या कारकिर्दीतील निराशाजनक कामगिरी होती. पहिल्यांदाच धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाला प्लेऑफमध्ये जागा मिळवता आली नाही. दरम्यान, आता धोनी आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर प्रश्न विचारला असता धोनीने आपण पुढच्या हंगामात खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आात धोनी पुढच्या हंगामात खेळेल पण चेन्नईचे कर्णधारपद दुसऱ्या कोणत्या तरी खेळाडूकडे दिलं जाण्याची शक्यता आहे. 

भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी म्हटलं होतं की,'धोनीने 2011 नंतर टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळलं. धोनीला माहिती होतं की आता सर्व तसंच नाही राहणार. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खराब कामगिरीनंतर धोनीला आमच्याकडे पर्याय नव्हता. मात्र विराटने चांगली कामगिरी केली तेव्हा धोनीने कसोटीचं कर्णधार पद सोडलं.' बागंर यांनी याआधी चेन्नईमध्ये नेतृत्व बदलाबद्दल वक्तव्य केलं होतं. तेव्हा बांगर यांनी फाफ डुप्लेसिस पर्याय ठरू शकतो म्हटलं होतं. 

हे वाचा - ऑलिम्पिक गेममध्ये टी-20 क्रिकेटचा थरार रंगायला पाहिजे: राहुल द्रविड

संजय बांगर यांनी म्हटलं होतं की, मला असं वाटतं की पुढच्या हंगामात धोनीने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सहभागी व्हावं आणि नेतृत्व इतर कोणाकडे तरी सोपवावं. धोनी डुप्लेसिसला नेतृत्व सोपवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.

चेन्नईकडे कर्णधारपदासाठी जास्त पर्याय नाहीत असंही संजय बांगर यांनी म्हटलं आहे. सध्या चेन्नईबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे धोनीला भक्कम पर्याय नाही. तसंच दुसरी कोणतीच टीम असा खेळाडू सोडण्यासाठी तयार नाही जो चेन्नईचा कर्णधार होऊ शकेल असंही संजय बांगर म्हणाले. 


​ ​

संबंधित बातम्या