IPL2020 ची संपूर्ण तयारी झाली; दादाने शेअर केले खास फोटो

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 15 September 2020

सौरव गांगुली  (Sourav Ganguly) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मैदानाची पाहणी केल्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ते अमिरात क्रिकेट बार्डाच्या प्रमुखांसोबत दिसतात. शारजहा आयपीएलच्या हंगामातील सामन्यासाठी सज्ज आहे, या कॅप्शनसह  गांगुली यांनी हे फोटो शेअर केले आहेत.  

IPL 2020 in UAE: भारतीय क्रिकेट मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला. युएईमधील दुबई, अबूधाबी आणि शारजाह या तीन मैदानावर आयपीएलचे सामने रंगणार आहेत. 19 सप्टेंबरपासून रंगणाऱ्या या स्पर्धेची सर्व तयारी झाली आहे. सौरव गांगुली यांनी शारजहा स्टेडियमला भेट देत यासंदर्भातील सविस्तर आढावा घेतला. देशासह जगभरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर यंदाच्या वर्षातील आयपीएल स्पर्धा युएईत खेळवण्याचे पक्क झाले. स्पर्धा संकटात असतानाही स्पर्धा पार पडेल, असा विश्वास गांगुली यांनी अनेकदा बोलून दाखवला होता. हा विश्वास आता सार्थ होताना दिसतोय.   

Image

सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर या महान क्रिकेटर्संनी शारजहाचे मैदान गाजवले आहे. युवा खेळाडूही या मैदानावर चमकदार कामगिरी करुन दाखवतील, असा विश्वास गांगुलींनी व्यक्त केलाय.

Image

गांगुली यांच्यासोबत आयपीएलचे अध्यक्ष बृजेश पटेल, माजी आयपीएल प्रमुख राजीव शुक्ला आणि आयपीएलचे कार्यकारी अधिकारी हमेमंग अमीन, बीसीसीआयचे संयुक्त जयश जॉर्ज आणि मबासिर उस्मानी यांच्याशिवाय अमिरात क्रिकेट बोर्डाचे अधिकाऱ्यांनीही यावेळी उपस्थितीत होते.  

Image

सौरव गांगुली  (Sourav Ganguly) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मैदानाची पाहणी केल्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ते अमिरात क्रिकेट बार्डाच्या प्रमुखांसोबत दिसतात. शारजहा आयपीएलच्या हंगामातील सामन्यासाठी सज्ज आहे, या कॅप्शनसह  गांगुली यांनी हे फोटो शेअर केले आहेत.  

Image

​ ​

संबंधित बातम्या