IPL 2021 : भगव्याची शान कायम ठेवा; ऑरेंज आर्मीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 11 April 2021

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंत एकमेकांविरुद्ध रंगलेल्या सामन्यात कोलकाता अधिक मजबूत दिसले आहे.

IPL 2021 : चेन्नईच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यापूर्वी सोशल मीडियावर #SRHvsKKR हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये आलाय. या हॅशटॅगच्या माध्यमातून क्रिकेट चाहते आपापल्या संघाला सपोर्ट करताना दिसते. यातील सनरायझर्स हैदराबाद संघाच्या समर्थनार्थ शेअर करण्यात येणारे काही फोटो लक्षवेधी ठरत असून ते तुफान व्हायरल होताना दिसत आहे. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघाला ऑरेंज आर्मी म्हणूनही ओळखले जाते. याच अनुषंगाने भगव्याची शान कायम राखा, असा संदेश हैदराबादचे चाहत्यांकडून देण्यात येत आहे. 

एका नेटकऱ्याने सपोर्ट भगवा टीम या कॅप्शनसह संघातील सहकाऱ्यांचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत वॉर्नरसह त्याच्या शिलेदारांच्या माथी भगवा नाम ओढल्याचे दिसून येते. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत कर्णधार डेविड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार, केन विल्यम्सन, राशीद खान आणि बेयरस्टोक्स दिसत आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या कपाळावर भगवा टिका लावून फोटो शेअर करण्यात आलाय. ऑरेंज आर्मीती सर्व ताफ्याचा फोटोसह टी नटराजन, आणि राशीद खान  मॅच विनिंग परफॉमन्स देतील, असा विश्वासही संघाला समर्थन देणारे चाहते व्यक्त करताना दिसते.

 पराभवानंतर गोलंदाजांना खडसावलं, वाचा काय म्हणाला धोनी

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंत एकमेकांविरुद्ध रंगलेल्या सामन्यात कोलकाता अधिक मजबूत दिसले आहे. त्यांनी 12  वेळा  सनरायझर्सला पराभूत केले आहे. दुसरीकडे 7 सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला आहे. चेन्नईच्या मैदानात कोलकाता आपले रेकॉर्ड आणखी मजबूत करणार की सनरायझर्स हैदराबाद आपल्या रेकॉर्डमध्ये सुधारणा करुन स्पर्धेतील सुरुवात विजयाने करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


​ ​

संबंधित बातम्या