IPL 2020 SRHvs KKR : निकाल सुपर ओव्हमध्ये!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 18 October 2020

कार्तिक मॉर्गन यांच्यात अर्धशतकी भागीदारी

Hyderabad vs Kolkata 35th Match : अखेरच्या षटकात अष्टपैलू समद आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सनं  दिलेले आव्हान परतवण्याची चिन्हे दिसत असताना सामना टाय झाला. समद बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकात हैदराबादला 18 धावांची गरज होती. वॉर्नरने रसेलच्या षटकात 17 धावा घेतल्यानंतर सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये लॉकी फर्ग्युसनने तीन चेंडूत 2 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. हैदराबादकडून मिळालेले आव्हान कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इ्यॉन मॉर्गन आणि दिनेश कार्तिकने तीन चेेंडूत पार केले.  

जॉनी बेयरस्ट्रो आणि केन विलियम्सन जोडीनं संघाच्या डावाला सुरुवात केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी सेट होतीय असे वाटत असताना लॉकी फर्ग्युसननं हैदराबादला पहिला धक्का दिला. केन 29 धावांवर बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी आलेला प्रियम गर्ग अवघ्या चार धावांवर माघारी फिरला. मनिष पांडे (6) आणि विजय शंकर (7) धावा करुन माघारी फिरल्यानंतर अब्दुल समदन कर्णधार वॉर्नरला उत्तम साथ दिली. ही जोडी संघाला विजय मिळवून देईल असे वाटत असताना उत्तुंग फटका मारण्याच्या नादात अब्दुल समद झेलबाद झाला. शिवम मावीच्या गोलंदाजीवर शिवमनं त्याचा झेल घेतला.   

अखेरच्या षटकात दिनेश कार्तिक आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकात 5 बाद 163 धावा केल्या आहेत. शुभमन गिल (36), राहुल त्रिपाठी (23) आणि नितीश राणा (29) धावा करुन परतल्यानंतर आंद्र रसेल पुन्हा फेल ठरला, तो अवघ्या 9 धावा करुन बाद झाला.  इयॉन मॉर्गन 23 चेंडूत 34 धावा करुन शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. कार्तिकने 14 चेंडूत 29 धावा केल्या.

सामन्याचे अपडेट्स

82-4 : लॉकी फर्ग्युसनची तिसरी विकेट, मनिष पांडे अवघ्या 6 धावांची भर घालून माघारी

70-3 : सलामीवीर जॉनी बेयरस्ट्रोच्या खेळीला ब्रेक, वरुण चक्रवर्तीनं घेतली विकेट

70-2 : युवा फलंदाज प्रियम गर्ग 4 धावा करुन माघारी, लॉकी फर्ग्युसनचा हल्लाबोल

57-1 : केन विलियम्सनच्या रुपात हैदराबादला पहिला धक्का, लॉकी फर्ग्युसनला यश

दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली

केन विलियम्सन आणि जॉनी बेयरस्ट्रोन केली हैदराबादच्या डावाची सुरुवात   

------------------------------------------------------------------------------------- 

163-5 : अखेरच्या चेंडूवर बासिलनं घेतली मॉर्गनची विकेट, कर्णधाराला साजेसा खेळ करत त्याने 23 चेंडूत 34 धावांची उपयुक्त खेळी केली.

105-4 : मसल पॉवर रसेलचा पुन्हा फ्लॉप शो, नटराजनचे दुसऱे यश

88-3 : विजय शंकरनं नितीश राणाला धाडले माघारी, त्याने 20 चेंडूत 29 धावा केल्या

87-2 : शुभमन गिल मोठी खेळी करण्यात पुन्हा अपयशी, राशिद खानला मिळाली विकेट

48-1 : सलामीवीर राहुल त्रिपाठी 16 चेंडूत 23 धावा करुन माघारी, नटराजनला मिळाले यश


​ ​

संबंधित बातम्या