IPL2020: मुंबई की चेन्नई ; गंभीरने सांगितलं कोण ठरणार वरचढ?

टीम ई-सकाळ
Tuesday, 15 September 2020

यंदाच्या बहुप्रतीक्षित इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेला सुरु होण्यासाठी अवघे चार दिवस बाकी आहेत. आयपीएल मधील सुरवातीचा पहिला सामना 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये रंगणार आहे.

यंदाच्या बहुप्रतीक्षित इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेला सुरु होण्यासाठी अवघे चार दिवस बाकी आहेत. आयपीएल मधील सुरवातीचा पहिला सामना 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये रंगणार आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक चार वेळा मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. आणि धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाच्या नावावर सर्वाधिक म्हणजे आठ वेळा अंतिम सामना गाठल्याचा रेकॉर्ड आहे. मात्र यंदाच्या वेळेस मुंबई इंडियन्सचा संघ हा चेन्नई सुपर किंग्स संघापेक्षा अधिक मजबूत असल्याचे मत गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. 

IPL2020 ची संपूर्ण तयारी झाली; दादाने शेअर केले खास फोटो

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना शनिवारी १९ सप्टेंबरला होणार आहे. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्सपेक्षा यंदा अधिक संतुलित असल्याचा दावा भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने केला आहे. तसेच मुंबईचा संघ चेन्नईपेक्षा वरचढ दिसत असल्याचे देखील गौतम गंभीरने म्हटले आहे. नुकतेच मुंबई संघाने ट्रेंट बोल्टला संघात सामील केले असल्यामुळे याचा जास्त फायदा होणार असून, नवीन बॉलने विकेट घेणारा गोलंदाज हवा असल्यास जसप्रीत बुमराहचा वापर मुंबईचा संघ करू शकणार असल्याचे गंभीरने म्हटले आहे. याव्यतिरिक्त गौतम गंभीरने मुलाखती दरम्यान, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही केवळ पहिल्या सामन्यातच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेत कसे कामगिरी करतात ते महत्वाचे ठरणार असल्याचे म्हटले आहे. 

IPL 2020 : सलामीच्या लढतीपूर्वी रोहित-धोनीनं घेतला गल्ली क्रिकेटचा आनंद (Video)

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामात पाचव्या वेळेस विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. तर नुकतेच भारतीय क्रिकेट संघातून निवृत्ती स्वीकारलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सचा संघ खेळणार आहे. मुंबईचा गोलंदाज लसिथ मलिंगाने यंदाच्या स्पर्धेतून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. त्यामुळे यंदा मुंबईला मलिंगा शिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना अबूधाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ससोबत होणार आहे. तर यंदाच्या आयपीएलचे सामने दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथील स्टेडियम वर खेळवण्यात येणार आहेत.        

मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शेरेफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, अनुकुल रॉय, ईशान किशन, क्विंटन डी कॉक, आदित्य तारे,धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, जेम्स पॅटिनसन, मिशेल मॅक्लेनाघन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, मोहसिन खान, प्रिन्स बलवंत रायसिंग, दिग्विजय देशमुख, जयंत यादव, नाथन कूल्टर-नाईल, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, अनुकुल रॉय. 

चेन्नई सुपर किंग्सचा संघ - महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), नारायण जगदीसन, ऋतुराज गायकवाड, के एम आसिफ, रवींद्र जडेजा, एम विजय, जोश हेजलवुड, केदार जाधव, कर्ण शर्मा, पीयूष चावला, अंबाती रायुडू, इम्रान ताहिर, दीपक चहर, फाफ डु प्लेसिस, शार्दुल ठाकूर, मिचेल सॅटनर, ड्वेन ब्राव्हो, लुंगी एनगीडी, सॅम करन, मोनू कुमार, शेन वॉटसन, साई किशोर. 
    


​ ​

संबंधित बातम्या