कोरोनाच्या लढाईसाठी आयपीएलच्या दोन संघांकडून आर्थिक साह्य

पीटीआय
Friday, 30 April 2021

राजस्थान रॉयल्स संघाने कोरोनाच्या लढाईसाठी साडे सात कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या लिलावात  सर्वाधिक विक्रमी बोली लावून मॉरिस या खेळाडूला आपल्या संघात घेतल्यामुळे राजस्थान रॉयल्स चर्चेत आले होते.

मुंबई - राजस्थान रॉयल्स संघाने कोरोनाच्या लढाईसाठी साडे सात कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या लिलावात  सर्वाधिक विक्रमी बोली लावून मॉरिस या खेळाडूला आपल्या संघात घेतल्यामुळे राजस्थान रॉयल्स चर्चेत आले होते. देशात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना आर्थिक मदत करणारे ते पहिले फ्रँचाईस ठरले आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे दीड कोटीचे साह्य
आयपीएलमधील फ्रँचाईजी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने दिल्ली राजधानी क्षेत्रातील दोन स्वयंसेवी संस्थांना दीड कोटीची मदत दिली आहे. दिल्लीत कोरोना रुग्ण वाढत आहेत, आयपीएल लढत होत असलेल्या अरुण जेटली स्टेडियमपासून काही किलोमीटरवरील रुग्णालयात ऑक्सिजनची वानवा आहे. या परिस्थितीत आयपीएल कशी होते, असा रोष दिल्लीवासीय करीत आहेत. आता आयपीएलमधील दिल्लीतील लढती सुरू झाल्यावर काही तासांत दिल्ली कॅपिटल्सने आपण जेएसडब्लू फौंडेशन आणि जीएमआर फौंडेशन दीड कोटीचे साह्य दोन स्वयंसेवा संस्थांना देत असल्याचे जाहीर केले.

आजचा सामना
पंजाब वि. बंगळूर प्रतिस्पर्ध्यांत २६ लढती
१४ विजय १२
२३२ सर्वोत्तम २२६
८८ नीचांक ८४

  • खेळपट्टीचा अंदाज - प्रत्येक सामन्यागणिक अहमदाबादमधील फलंदाजी अवघड, पंजाबला कोलकताविरुद्ध याचा अनुभवही. 
  • हवामानाचा अंदाज - लढतीच्यावेळी अंदाजे तपमान ४० अंश, दवाचा परिणाम, पण त्याचवेळी दिल्ली - बंगळूर लढतीच्यावेळी वाळूच्या वादळाने दवाचा परिणामच गेला
  • गुणतक्त्यात - पंजाब सहाव्या क्रमांकावर तर बंगळूर दुसऱ्या
  • यंदाच्या स्पर्धेत - पंजाबचे सहापैकी दोन सामन्यात विजय, तर बंगळूरचे सहापैकी पाच सामन्यात
  • गेल्या पाचपैकी तीन लढतीत बंगळूरचा विजय
  • गतस्पर्धेतील दोन्ही लढतीत पंजाबची सरशी
  • पंजाबचे १४ पैकी नऊ विजय धावांचा पाठलाग करताना
  • बंगळूर धावांचा पाठलाग करताना तसेच प्रथम फलंदाजी करताना प्रत्येकी सहावेळा विजयी

ठिकाण - नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
संध्या. ७.३० पासून स्टार स्पोर्टस््


​ ​

संबंधित बातम्या