CSKvs DC : रबाडा-फाफ धडकेनंतरचा 'ऑल इज वेल' सीन (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 17 October 2020

फाफ ड्युप्लेसी काही वेळ मैदानावर पडून राहिल्याचे दिसले. रबाडाने खिलाडूवृत्तीचे दर्शन करुन देत फाफकडे धाव घेतली. ऑल इज वेल असल्याची खात्री झाल्यानंतर पुन्हा दोघे आपापल्या कामाला लागले.

शारजाच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात सलामीवीर फाफ ड्युप्लेसीनं स्पर्धेतील आणखी एक अर्धशतक झळकावले. चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील 6 व्या षटकात रबाडाने टाकलेल्या पाचव्या चेंडू टोलवल्यानंतर फाफ एका धावेसाठी पळाला. यावेळी चेंडूकडे पाहत पळताना दिसले. दुसरीकडे चेंडू फेकणारा रबाडाही फाफने मारलेल्या चेंडूकडे पाहत होता. त्यामुळे चेंडूकडे लक्ष असलेल्या फलंदाजामध्ये आणि गोलंदाजामध्ये जोरदार धडक झाली. 

RRvsRCB: शाब्बास! शहाबाजचा हा झेल एकदा पाहाच (VIDEO)

फाफ ड्युप्लेसी काही वेळ मैदानावर पडून राहिल्याचे दिसले. रबाडाने खिलाडूवृत्तीचे दर्शन करुन देत फाफकडे धाव घेतली. ऑल इज वेल असल्याची खात्री झाल्यानंतर पुन्हा दोघे आपापल्या कामाला लागले. फाफने या सामन्यात अर्धशतक झळकावले. स्पर्धेतील त्याचे ही चौथे अर्धशतक ठरले. चेन्नई सुपर किंग्जच्या डावाची सुरुवात करणाऱ्या फाफ ड्युप्लेसीने 9 सामन्यातील 9 डावात 4 अर्धशतकांसह 365 धावा केल्या असून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. नाबाद 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात वॉटसन आणि फाफ ड्युप्लेसी जोडीनं संघाला 10 विकेट्सनी विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यात त्याने स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या केली होती. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने 47 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या  मदतीनं 58 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील 15 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर कागिसो रबाडाने शिखर धवन करवी फाफ ड्युप्लेसीला झेलबाद केले.  
 
 


​ ​

संबंधित बातम्या