IPL 2020 गब्बरची जब्बर खेळी; शारजाच्या मैदानात T20 तील पहिलं शतक

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 17 October 2020

शिखर धवनचे टी-20 कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे.  

Delhi vs Chennai, 34th Match : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली. किंग्ज इलेव्हन पंजाबाचा कर्णधार लोकेश राहुलनं स्पर्धेतील पहिले शतक झळकावले होते. त्यानंतर याच संघातील मयांकच्या बॅटमधून शतकी खेळी निघाली. स्पर्धेतील तिसरे शतक भारताच्या अनुभवी गड्याने झळकावले. आतापर्यंत जी शतके झाली आहेत त्यात भारतीय फलंदाज आघाडीवर असल्याचे दिसते. शिखर धवनचे टी-20 कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे.  

IPL 2020: एबीच्या षटकारानं RCB चा विजय; RR 'स्मित' हास्याला मुकलं

पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांनी लवकर साथ सोडल्यानंतर शिखर धवनला कर्णधार श्रेयस अय्यरची साथ मिळाली. याशिवाय चेन्नईच्या संघाने त्याचे तीन झेल सोडले. याचा पूरेपूर फायदा उठवत धवनने टी-20 कारकिर्दीतील आपले पहिले शतक झळकावले. मागील काही सामन्यात शिखर धवन दमदार कामगिरी करताना दिसतोय. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने 57 धावांची खेळी केली होती. मुंबई इंडियन्स विरुद्ध देखील त्याने  69 धावांची नाबाद खेळी केली होती. चेन्नई विरुद्ध त्याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सलग तिसरे अर्धशतक झळकावले. चेन्नईच्या बिथरलेल्या फिल्डिंगचा फायदा घेत त्याने शतक झळकावत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. 

DC vs CSK : धवनच्या शतकानंतर 'ढाई अक्षर प्रेम के...' दिल्लीचा सॉलिड विजय!

चेन्नई विरुद्धच्या शतकी खेळीनंतर शिखर धवन यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये पोहचला आहे. शिखर धवनने 9 सामन्यातील 9 डावात 2 अर्धशतके आणि 1 शतकासह 359 धावा केल्या आहेत. चेन्नई विरुद्ध केलेल्या नाबाद 101 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. शिखर धवन हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज आहे. यातील यंदाच्या हंगामात त्याच्या नावे 39 चौकार आहेत तर 7 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या