DC vs CSK : धवनच्या शतकानंतर 'ढाई अक्षर प्रेम के...' दिल्लीचा सॉलिड विजय!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 17 October 2020

शारजाच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Delhi vs Chennai 34th Match : शिखर धनवचे नाबाद शतक आणि अक्षर पटेलने मोक्याच्या क्षणी लगावलेल्या उत्तुंग षटकाराच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले. श्रेयस अय्यर (23) स्टॉयनिस (24) धावा करुन परतल्यानंतर दुसऱ्या बाजूने धवनने खिंड लढवली. त्याने टी-20 कारकिर्दीतील आपले पहिले शतक पूर्ण केले. त्याची शतकी खेळी व्यर्थ जाते का? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अक्षर पटेलने षटकारांची बरसात करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने 5 चेंडूत 21 धावा केल्या.  

शारजाच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील सामन्याप्रमाणे फाफ ड्युप्लेसिसोबत चेन्नईच्या संघाकडून सॅम कुरेन मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. तुषार देशपांडेनं पहिल्या षटकात त्याला माघारी धाडले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या शेन वॉटसनने फाफ ड्युप्लेसीसोबत 87 धावांची भागीदारी केली.

नोर्टजेनं वॉटसनला माघारी धाडत चेन्नईला दुसरा धक्का दिला, तो 36 धावांवर बाद झाला. त्यानंतर रबाडाने सेट झालेल्या फाफ ड्युप्लेसीसला धवनकरवी झेलबाद केले. धोनीच्या रुपात नोर्टजेनं चेन्नईला चौथा धक्का दिला. अखेरच्या षटकात अंबाती रायडूनं 25 चेंडूत केलेल्या नाबाद 45 धावा आणि रविंद्र जडेजाच्या 13 चेंडूतील नाबाद 33 धावांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित 20 षटकात 4 बाद 179 धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

सामन्याचे अपडेट्स : 

 159-5 : मोक्याच्या क्षणी सॅम कुरेनं घेतली कॅरीची विकेट

137-4 : शार्दुल ठाकूरनं स्टॉयनिसला 24 धावांवर धाडले तंबूत

94-3 : श्रेयस अय्यर झेलबाद, डिजे ब्रावोनं घेतली विकेट

26-2 : अजिंक्य रहाणे पुन्हा फेल, दीपक चाहरने 8 धावांवर घेतली विकेट

0-1 : डावातील पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉ माघारी, दीपक चाहरनं दिल्लीला दिला धक्का

-----------------------------------------------------------------------------------------------

फाफ ड्युप्लेसीचं अर्धशतक

129-4 : धोनी 3 धावा करुन परतला, नोर्टजेनं घेतली विकेट

109-3 : फाफ ड्युप्लेसिसला रबाडाने धवनकरीव केलं झेल बाद, त्यानं 58 धावांची खेळी केली.   
 

 

 87-2 : वॉटसन 36 धावा करुन माघारी, नोर्टजेनं घेतली विकेट

0-1 : सॅम कुरेनच्या रुपात चेन्नईला पहिला धक्का, तुषारनं पहिल्याच षटकात धाडलं माघारी, सीमारेषेवर नोर्टजेचा सर्वोत्तम झेल

Delhi Capitals (Playing XI): पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, एलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, तुषार देशपांडे, कागिसो रबाडा, अर्निच नोर्टजे. Chennai Super Kings (Playing XI): फाफ ड्युप्लेसीस, शेन वॉटसन, अंबाती रायडू, एमएस धोनी (यष्टिरक्षक/ कर्णधार), केदार जाधव, रविंद्र जडेजा, सॅम कुरेन, ड्वेन ब्रावो, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, करन शर्मा. नाणेफेक जिंकून धोनीनं घेतला फलंदाजीचा निर्णय


​ ​

संबंधित बातम्या