धोनी इतका तंदुरुस्त कसा काय? जाणून घ्या रहस्य 

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 20 April 2021

धोनी इतका तंदुरुस्त का राहतो? याबाबतच रहस्य त्यानं राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर उलघडलं

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी आजही तंदुरुस्त दिसतोय. 40 व्या वर्षातही तरुणाला लाजवेल अशी फिटनेस धोनीची आहे. धोनी इतका तंदुरुस्त का राहतो? याबाबतच रहस्य त्यानं राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर उलघडलं आहे. समालोचक हर्षा भोगले यांनी वाढतं वय आणि फिटनेसवर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना धोनी म्हणाला की , "वयस्कर होणं आणि तंदुरुस्त राहणं, या दोन्ही अतिशय कठीण गोष्टी आहेत. जर तुम्ही खेळत असाल अन् तुम्हाला कोणी तंदुरुस्त नाही, असे म्हटले नाही पाहिजे. त्यामुळेच संघातील तरूण खेळांडूसारखं स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण वाढत्या वयात ही अग्निपरीक्षाच असते."
 
नेहमी तरुण खेळाडूंची बरोबरी करावी लागते. खेळपट्टीवर धावताना असो किंवा क्षेत्ररक्षण करताना. नेहमीच तरुण खेळाडूंच्या तोडीस तोड राहवं लागतं. आपल्याला कोणी अनफिट म्हणायला नको. त्यामुळेच मी स्वत:ला नेहमी फीट ठेवतो, असं धोनी म्हणाला. कामगिरीचा तंदुरुस्तीशी काहीही संबंध नाही. ज्यावेळी मी 24 वर्षाचा होतो तेव्हाही चांगली कामगिरी करेन याची गॅरेंटी देऊ शकत नव्हतो आणि आताही 40 व्या वर्षातही देऊ शकत नाही. जर तुम्ही माझ्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करत नसाल तर माझ्यासाठी पॉझिटिव्ह बाब आहे, असेही धोनी म्हणाला.  

संघाच्या कामगिरीबाबत बोलताना धोनी म्हणाला की, "दीपक चाहर आणि सॅम करन यांनी पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली.  दीपक आणखी फूल लेंथ आणि स्विंग गोलंदाजी करु शकला असता.पण हा एक खेळाचा एक भाग आहे. आमच्याकडे पाच दर्जेदार गोलंदाज आहेत. त्यामुळे सहाव्या गोलंदाजाची गरजही नाही. पण आमच्याकडे मोईन अलीच्या रुपानं सहावा पर्यायही आहे. जो फक्त विकेटच घेत नाही तर धावाही रोखतो."

चेन्नईचा विजय
सोमवारी झालेल्या सामन्यात चेन्नईनं नाणेफेक गमावली मात्र, सामना 45 धावांनी जिंकला. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 188 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्त्युत्तर राजस्थानचा संघ 143 धावांपर्यंत मजल मारु शकला. 


​ ​

संबंधित बातम्या