चेन्नईच्या अडचणीत भर ; प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त 

टीम ई-सकाळ
Sunday, 18 October 2020

इंडियन प्रीमिअर लीग मध्ये काल डबल हेडर मधील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्सवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला.

इंडियन प्रीमिअर लीग मध्ये काल डबल हेडर मधील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्सवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीच्या संघाला अखेरच्या षटकात 17 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर रवींद्र जडेजाने टाकलेल्या या अखेरच्या षटकात दिल्लीच्या फलंदाजांनी 22 धावा केल्या आणि हा सामना दिल्लीने जिकला. 

IPL 2020 : अंपायरच्या लुक्सवरून सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर 180 धावांचे लक्ष दिल्लीला दिले होते. हे लक्ष दिल्लीच्या संघाने 5 विकेट्स आणि एक चेंडू राखत गाठले. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने नाबाद 101 धावा करत यंदाच्या आयपीएल मध्ये पहिले शतक झळकावले. मात्र या सामन्यात धोनीने शेवटचे षटक रवींद्र जडेजाला दिल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. कारण भरवशाचा गोलंदाज अशी ओळख असलेल्या ड्वेन ब्राव्होने हे शेवटचे षटक टाकणार असल्याची सर्वांचीच अपेक्षा होती. 

दिल्लीच्या संघाला शेवटच्याच षटकात हातात असलेला सामना गमवावा लागल्याने धोनीच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी देखील प्रकट केली. पण ड्वेन ब्राव्हो जखमी झाल्याने धोनीला नाईलाजास्तव जडेजाला गोलंदाजी द्यावी लागल्याचे सामन्यानंतर उघडकीस आले. ड्वेन ब्राव्होला ग्रोइन इन्जरी झाल्याची माहिती मिळाली असून, तो यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. 

MIvsKXIP : हार्दिकचा नव्या लूकची चर्चा तर होणारच!

सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. ब्राव्होच्या दुखापतीसंदर्भातील अहवाल आज रविवारी संध्याकाळपर्यंत येणार असल्याचे त्यांनी सांगितले असून, त्यानंतरच ड्वेन ब्राव्होला किती काळ मैदानाबाहेर राहावे लागणार असल्याचे स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्याच्याबद्ल्यात दुसऱ्या रिप्लेसमेंट खेळाडूची व्यवस्था होणे सध्यातरी कठीण असल्याचे काशी विश्वनाथन यांनी म्हटले आहे. याशिवाय रिप्लेसमेंट खेळाडू जरी आला तरी त्याला काही काळासाठी क्वारंटाईन व्हावे लागेल, आणि यात बराच वेळ लागले. त्यामुळे ब्राव्होच्या बदल्यात सीएसकेकडून नवा खेळाडू मागणी करण्याची शक्यता फारच कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.          


​ ​

संबंधित बातम्या