राजस्थानला मोठा धक्का, बेन स्टोक्स आयपीएलमधून बाहेर

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 April 2021

IPL 2021 : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे उर्वरीत आयपीएलला मुकणार

IPL 2021 : आयपीएलच्या१४ व्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली अन् दुखापतीचं सत्र सुरु झालं आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे उर्वरीत आयपीएलला मुकणार आहे. बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीचा राजस्थान संघाला मोठा फटका बसणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात बेन स्टोक्स दुखापतग्रस्त झाला. पंजाबविरोधात झालेल्या सामन्यात बेन स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली. दुखापत गंभीर असल्यामुळे पुढील दोन महिने स्टोक्स क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

आयपीएल २०१४ मधील आपल्या पहिल्याच सामन्यात राजस्थानला पंजाबकडून चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यातच भर म्हणून संघातील स्टार खेळाडू बेन स्टोक्स दुखपतग्रस्त झाला आहे. बेन स्टोक्स आयपीएलमध्ये खेळणार नसला तरी संघाच्या सपोर्टसाठी सोबत राहणार आहे.  

पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान ख्रिस गेल याचा झेल घेताना  बेन स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली. ड्राईव्ह मारत स्टोक्सनं अप्रतिम झेल घेत विस्फोटक गेलचा डाव संपुष्टात आणला होता. त्यावेळी दुखापतीची जाणीव झाली नाही. पण विकेट घेतल्याचं सेलिब्रेशन करताना स्टोक्सला बोटाच्या दुखापतीची जाणीव झाली. बोटला दुखापत झाल्यामुले प्रचंड वेदना होत असतानाही स्टोक्स फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. २२२ धावांचा पाठलाग करताना चांगल्या सुरुवातीची आवशकता होती. मात्र, स्टोक्सला एकही धाव काढता आली नाही.

संजूची शतकी खेळी व्यर्थ

आयपीएलमध्ये प्रथमच कर्णधारपदाची जबाबदारी मिळालेल्या सॅमसनने पंजाबविरुद्ध काल वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कमालीची शतकी खेळी केली. ६३ चेंडूत १२ चौकार आणि सात षटकारांसह त्याने ११९ धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना अक्षरदीप सिंगच्या चेंडूवर सॅमसन सीमारेषेवर झेलचीत झाला आणि पंजाबने हा सामना चार धावांनी जिंकला.


​ ​

संबंधित बातम्या