IPL 2021 : वीकेंड लॉकडाऊनमध्येही खेळाडू रात्रीपर्यंत प्रॅक्टिस करणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 April 2021

हैदराबाद संघटनेला मुंबईतील सामने आयोजित करण्यासाठी सज्जतेच्या सूचनाही देण्यात आल्याचे वृत्त होते; परंतु सौरव गांगुलीने या सर्व चर्चांवर पडदा टाकला.

मुंबई : मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या त्यातच वानखेडे स्टेडियममध्ये ग्राऊंसड्समनच्या  माध्यमातून कोरोना विषाणूने केलेला प्रवेश अशा चिंता वाढवणाऱ्या घडामोडी घडत असल्या तरी मुंबईतील सामने मुंबईतच होतील; इतरत्र हलवण्याचा प्रश्न नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहे. आयपीएलचा मुहूर्त जसा जवळ येत चालला आहे, तसे कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे मुंबईत होणाऱ्या दहा सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हैदराबाद संघटनेला मुंबईतील सामने आयोजित करण्यासाठी सज्जतेच्या सूचनाही देण्यात आल्याचे वृत्त होते; परंतु सौरव गांगुलीने या सर्व चर्चांवर पडदा टाकला.

IPL 2021 : गुणवत्तेला न्याय देणार का?

एकदा का जैवसुरक्षा वातावरण तयार करण्यात आले आणि त्यात संबंधितांना ते लागू झाले, की काहीही बदल होणार नाही. गतवेळेस अमिरातीत झालेली आयपीएल सुरू होण्याअगोदर काही जण कोरोनाबाधित झाल्याचे प्रसंग घडले होते; परंतु स्पर्धा सुरू झाल्यावर सर्व काही व्यवस्थित झाले, असे गांगुली यांनी कोलकातील दि टेलिग्राफ या दैनिकाशी बोलतान सांगितले. महाराष्ट्र सरकारने वीकेंड लॉकडाऊन आणि रात्रीची संचारबंदी जाहीर केलेली असली, तरी त्यांनी आयपीएलचे सामने आयोजित करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कोणतीच अडचण येणार नाही. खेळाडूंसह सर्वच जण जैवसुरक्षा वातावरणात आहेत आणि ही सुरक्षा कडेकोट आहे, प्रत्येक जण सुरक्षित आहे, असा विश्वास गांगुली यांनी व्यक्त केला. 

IPL 2021 : सनरायझर्सला आव्हान शेवटचा टप्पा गाठायचे

यंदाच्या बहुचर्चित आयपीएलला ९ एप्रिलपासून चेन्नईतून सुरवात होत आहे. मुंबईतील दहा सामने १० ते २५ एप्रिल या कालावधीत होत आहेत. वानखेडे स्टेडियमवर आयपीएलसाठी मैदानाची तयारी करणारे १० ग्राऊंसड्समनच्या आणि स्पर्धा संयोजनातील आठ जण कोरोनाबाधित झाले, त्यातच मुंबईत सामने खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल संघाचा अक्षर पटेल आणि चेन्नई संघाच्या तांत्रित टीममधील एक सदस्य कोरोनाग्रस्त झाल्यामुळे 

प्रकाशझोतातील सरावास मंजुरी

महाराष्ट्र सरकारने आयपीएलच्या सामन्यासाठी प्रकाशझोतात सराव करण्यास मंजुरी दिली आहे. आयपीएलमधील सामने प्रकाशझोतात असल्याने संघांना सीसीआय तसेच वांद्रे कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट संघटनेच्या सरावास मंजुरी दिली आहे. त्यात रात्री दहापर्यंतचा सरावही मान्य केला आहे. 

जैवसुरक्षेतही कोरोना बाधित?

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जैवसुरक्षा वातावरणात राहणाऱ्या १४ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले; मात्र यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही. हे सर्व जण आयपीएलचे प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पंचतारांकित हॉटेलमध्ये सामन्यांचे प्रक्षेपण करणारे कॅमेरामन, निर्माते, दिग्दर्शक तसेच ईव्हीएस ऑपरेटर्सच्या (स्लो आणि अल्ट्रा मोशन रिप्ले दाखवणारे), तसेच व्हिडीओ एडिटर्सच्या निवासाची व्यवस्था आहे.


​ ​

संबंधित बातम्या