आयपीएलच्या यशस्वितेसाठी बीसीसीआयची संपर्क मोहीम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 May 2021

आयपीएलचा प्रस्तावित दुसरा टप्पा यशस्वी होण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने विविध देशातील क्रिकेट मंडळांबरोबर संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. क्रिकेटजगतातील आपली आर्थिक ताकदीचा उपयोग करीत परदेशातील सर्व प्रमुख खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध व्हावेत, यासाठी व्यूहरचनाही तयार होत आहे.

नवी दिल्ली - आयपीएलचा प्रस्तावित दुसरा टप्पा यशस्वी होण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने विविध देशातील क्रिकेट मंडळांबरोबर संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. क्रिकेटजगतातील आपली आर्थिक ताकदीचा उपयोग करीत परदेशातील सर्व प्रमुख खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध व्हावेत, यासाठी व्यूहरचनाही तयार होत आहे. 

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आयपीएलसाठी खेळाडू सोडण्यास तयार आहे; मात्र इंग्लंडमधील खेळाडूंबाबत अनिश्चितता आहे. आगामी मोसमात आंतरराष्ट्रीय लढतींच्या वेळी आमचे खेळाडू लीगसाठी उपलब्ध नसतील, असे इंग्लंड मंडळाचे संचालक अॅश्ले गाईल्स यांनी सांगितले आहे, पण इंग्लंड मंडळाबरोबर भारतीय मंडळाचे खजिनदार अरुण धुमल यांनी चर्चा सुरू केल्याचे समजते.

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याच्या संकल्पित तारखांच्या कालावधीत कॅरेबियन प्रीमियर लीग आहे. आयपीएलचा उर्वरित मोसम सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये अमिरातीत होईल, हे जाहीर करण्यापूर्वीच भारतीय मंडळाने विंडीज मडळासह चर्चा केली आहे. आयपीएलचा उत्तरार्ध १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. 

कोरोनाचे नव्हे करसवलतीचे आव्हान
विश्वकरंडक ट्वेंटी २० बाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी एक महिना वाढवून देण्यासाठी भारतीय मंडळ प्रयत्नशील आहे. याचे कारण कोरोना नसून आयसीसीला विश्वकरंडक स्पर्धेबाबत हवी असलेली करमाफी हे आहे. या परिस्थितीत भारतीय मंडळास केंद्र सरकारला ९०० कोटी रुपये देणे भाग पडेल. याचे परिणाम २०२३ मधील विश्वकरंडक स्पर्धेवरही होतील. २०१६ च्या स्पर्धेची करसवलत न मिळाल्याने आयसीसीने भारताचे तीन कोटी डॉलर रोखले आहेत. केंद्र सरकारला भरपाई देऊन विश्वकरंडक स्पर्धा घेण्याबाबत भारतीय मंडळात एकमत असल्याचे समजते.


​ ​

संबंधित बातम्या