IPL2020 : कोरोनाच्या संकटातही BCCI ने साधली संधी; IPL मध्ये कमावले इतके रुपये   

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

कोरोनाच्या कारणामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचे आयोजन मार्च महिण्याऐवजी सप्टेंबर महिन्यात आणि ते देखील भारताबाहेर संयुक्त अरब अमिरातीत घेण्यात आला.

कोरोनाच्या कारणामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचे आयोजन मार्च महिण्याऐवजी सप्टेंबर महिन्यात आणि ते देखील भारताबाहेर संयुक्त अरब अमिरातीत घेण्यात आला. मार्च महिन्यानंतर एकावेळेस यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेचा मोसम रद्द होतो की काय असे वाटत असतानाच बीसीसीआयने मात्र ही स्पर्धा विनाअडथळा यशस्वीरीत्या पार पाडून दाखवली. बीसीसीआयने युएईच्या भूमीवर आयपीएल आयोजित केले आणि मोठ्या प्रमाणात कमाई देखील केली.  

AUSvsIND : वार्नर म्हणतो; उरले-सुरले दिवस स्लेजिंग न करता खेळणार

आयपीएल स्पर्धेचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळवण्यात आला होता. त्यानंतर आयपीएल हा भारतीय क्रिकेट बोर्डाचा सर्वात मोठा महसूल स्त्रोत ठरला आहे. आणि म्हणूनच बीसीसीआयला कोणत्याही परिस्थितीत आयपीएल आयोजित करण्याची इच्छा होती. यावेळेस ही स्पर्धा रद्द करावी लागली असती तर, बीसीसीआयला 4000 कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला असता. त्यामुळेच बीसीसीआयने भारताबाहेर ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि ती यशस्वी केली.   

आयपीएलची स्पर्धा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात युएईच्या शारजाह, अबूधाबी आणि दुबईमध्ये खेळले गेले. त्यानंतर अमिराती क्रिकेट बोर्डाच्या मदतीने बीसीसीआयने यशस्वीरित्या 4000 कोटी रुपये कमावले. याशिवाय स्पर्धेने विक्रमी प्रेक्षकांची कमाईही केली. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी आयपीएल 2020 च्या यशस्वीतेबद्दल एका मुलाखतीत बोलताना बीसीसीआयने साथीच्या काळात देखील मिळवलेल्या रकमेचा खुलासा केला आहे. त्यांनी यावेळेस टीव्ही व्ह्यूअरशिप जवळपास 25 टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले असून, सर्वाधिक दर्शक मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याला मिळाल्याचे अरुण धुमाळ यांनी म्हटले आहे. 

AUSvsIND : विराटच्या अनुपस्थितीवर पॉन्टिगनंतर आता इयान चॅपल यांचा शाब्दिक हल्ला

याव्यतिरिक्त, स्पर्धेला सुरवात होण्यापूर्वी आणि स्पर्धा चालू असताना जवळपास 30 हजाराहून अधिक कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती अरुण धुमाळ यांनी या मुलाखतीत दिली. त्याशिवाय या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी 1500 हून अधिक सदस्यांनी एकत्रित काम केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आणि स्पर्धेच्या सुरवातीला चेन्नईच्या संघातील काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, व त्यामुळे संपूर्ण स्पर्धेवरच काळे ढग आले होते. मात्र त्यानंतर कोणताही खेळाडू अथवा सदस्य कोरोना बाधित आढळला नसल्याने स्पर्धा व्यवस्थित पार पडल्याचे अरुण धुमाळ यांनी यावेळेस सांगितले.     


​ ​

संबंधित बातम्या