ब्रावोचा CPL-IPL चा 'तो' योगायोग जुळला तर यंदा युएईत धोनीच्या हातात दिसेल ट्रॉफी

सुशांत जाधव
Friday, 11 September 2020

ब्रावोच्या कॅरेबियन लीगमधील संघाता आणि आयपीएल लीगमधील संघाचा 2018 चा योगायोग जुळून आला तर चेन्नईचा संघ मुंबई इंडियन्सच्या चौकाराची बरोबरी करु शकतो.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन झालेली क्रिकेटची मैदाने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्याने अनलॉकला सुरुवात झाली. त्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये 6 संघाचा सहभाग असलेली  कॅरेबियन लीग स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटमधील लीग स्पर्धा अनलॉकचा दुसरा टप्पा क्रिकेट चाहत्यांनी अनुभवला. वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेली स्पर्धा आगामी आयपीएलच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भारतातील लोकप्रिय इंडियन लीग स्पर्धेला आता काही दिवसच उरले आहेत. कॅरेबियन लीगमध्ये झळकलेले काही चेहरे दुबईत रंगणाऱ्या आयपीएलच्या मैदानातही उतरणार आहेत. ज्या संघाने कॅरेबियन लीगमध्ये विक्रमी जेतेपद पटकावले तो केरेन पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. दुसरीकडे याच संघातून खेळलेला चॅम्पियन डिजे ब्रावो धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसणार आहे. 

CPL 2020 : यंदा 'लुंगी डान्स' नाय...पण शाहरुखने जंगी सेलिब्रेशन केलेच! 

कॅरेबियन लीगमधील अंतिम सामन्यानंतर ट्विटरवर ब्रावो ट्रेंण्ड पाहायला मिळाला. अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या डॅरेन ब्रावोसह डीजे ब्रोवोसंदर्भातही यावर प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. यातील एका चाहत्याचे ट्विट लक्षवेधी असे होते. CSK Fans Army या ट्विटरवरुन एका कमालीच्या योगायोगाचा दाखला देत यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईला जेतेपद जिंकण्याचा पराक्रम करण्याची संधी असल्याचा तर्क मांडण्यात आला आहे. 2018 च्या कॅरेबियन लीगमध्ये ब्रावोच्या नेतृत्वाखाली ट्रिनबागो नाइट रायडर्सने जेतेपदावर नाव कोरले होते. यावर्षी आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली होती. यंदाच्या कॅरेबियन लीगमध्ये ब्रावोचा संघ जिंकला. आता आयपीएलमध्येही धोनीचा संघ जिंकल्याचे पाहायला मिळेल का? असा तार्किक प्रश्न या ट्विटर अकाउंटवरुन उपस्थितीत करण्यात आला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 

ट्रिनबागो नाइट रायडर्सने फायनल रात्रही गाजवली, विक्रमी चौकारसह ठरले चॅम्पियन!

आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ड्वेन ब्रावोच्या नावे कॅरेबियन लीगमध्ये सर्वाधिक विकेट्सची नोंद आहे. एवढेच नाही तर यंदाच्या हंगामात त्याने टी-20 मध्ये 500 विकेट्सचा टप्पा पार करत अनोखा विक्रम आपल्या नावे नोंदवलाय. टी-20 मध्ये 500 बळी घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. कॅरेबियन लीगमध्ये ब्रावोच्या संघाचे हे चौथे जेतेपद आहे. दुसरीकडे आयपीएलमध्ये चेन्नईने आतापर्यंत तीनवेळा जेतेपद पटकावले आहे. ब्रावोच्या कॅरेबियन लीगमधील संघाता आणि आयपीएल लीगमधील संघाचा 2018 चा योगायोग जुळून आला तर चेन्नईचा संघ मुंबई इंडियन्सच्या चौकाराची बरोबरी करु शकतो. 
 


​ ​

संबंधित बातम्या