अमिरातीत होणारी आयपीएल 'यांच्या' साठीही ठरणार खर्चिक 

शैलेश नागवेकर
Wednesday, 29 July 2020

आयपीएलमध्ये प्रथमच उत्तजेक चाचणी करण्याची जबाबदारी असणारी राष्ट्रीय उत्तेजक चाचणी एजन्सी (नाडा) आयपीएल दुबईत होत असल्यामुळे आऊटसोर्स करण्याची शक्‍यता आहे.

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये प्रथमच उत्तजेक चाचणी करण्याची जबाबदारी असणारी राष्ट्रीय उत्तेजक चाचणी एजन्सी (नाडा) आयपीएल दुबईत होत असल्यामुळे आऊटसोर्स करण्याची शक्‍यता आहे. परंतु त्यासाठी अधिक खर्च अपेक्षित आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

चाचणी नमुने घेण्याचा खर्च कमी करण्यासाठी 'नाडा'कडे दोन पर्याय आहेत. अमिराती राष्ट्रीय उत्तेजक चाचणी संघटनेकडून ते नमुने घेऊ शकतात किंवा गेली 12 वर्षे आयपीएलमध्ये खेळाडूंचे नमुने घेणाऱ्या स्वीडनच्या संस्थेला हे काम देऊ शकतात. 2019 पासून बीसीसीआय 'नाडा'च्या अधिपथ्याखाली आले आहेत त्यामुळे यंदा प्रथमच उत्तेचक चाचणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. 

`वदे भारत'द्वारे परदेशी कुस्ती कोच भारतात  

आयपीएल अमिरातीत खेळवण्याच्या सर्व मान्यतांची प्रक्रिया पुढील आढवड्यात पूर्ण होतील आणि त्यानंतर आम्ही नाडाकडे खेळाडूंची यादी हस्तांतरीत करू. चाचणीसाठी नमुने गोळा करणे आणि त्यांचा प्रवास खर्च हा सर्व नाडाने करायचा आहे, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. या संदर्भात नाडाने अधिक माहिती देण्यास नकार दिला. या विषयावर आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर माहिती देऊ असे नाडाचे प्रमुख नवीन अग्रवाल यांनी सांगितले. 

दुबईतील चाचणी स्वस्त ठरणार? 
दुबईतील संस्थेतर्फे आयपीएल खेळाडूंचे चाचणी नमुने घेणे 'नाडा'साठी कमी खर्चिक ठरू शकेल. कारण दुबईतून नमुने घेतल्यानंतर ते दोहा येथील 'वाडा'च्या मान्यप्राप्त प्रयोगशाळेत पाठवणे महागडे ठरणार नाही. तसेही 'नाडा' घेणारे सर्व चाचणीचे नमुने दोहाच्या प्रयोगशाळेतच तपासण्यास पाठवत आहे. कारण 'नाडा'च्या प्रयोगशाळेत चाचणीसाठी आंतरराष्ट्रीय समितीने बंदी घातलेली आहे.   
 


​ ​

संबंधित बातम्या