असा हवा आयपीएलचा संघ मालक म्हणतो...चीनचे अर्थकारण बंद करा

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

राष्ट्रासाठी आपणही हे करू शकतो, देश पहिला नंतर पैसा आणि आपली इंडियन प्रीमियर लीग आहे चायना प्रीमियर लीग नाही. आपण सर्वांससमोर उदाहरण उभे करू शकतो. नेस वाडिया, उद्योजक आणि पंजाब संघाचे सहमालक

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये  असलेल्या चिनी प्रायोजकत्वाबाबत अजून निर्णय झालेला नाही. बीसीसीआयला विस्मरण झाले की काय अशा बातम्या प्रसिद्ध होत असताना किंग इलेव्हन पंजाबचे सहमालक असलेल्या नेस वाडिया यांनी आयपीएलमधील चिनी प्रायोजक हळूहळू रद्द करा अशी मागणी केली आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात आपल्या 30 जवानांची चिनी सैनिकांनी हत्या केल्यानंतर चीनविरुद्ध वातावरण तापले आहे.  चीनच्या वस्तूंवर सर्वत्र बंदीच्या मागणीने जोर पकडलेला आहे. केंद्र सरकारने कालच चिनच्या 59 मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली आहे. चिनी कंपन्यांचे  प्रायोजकत्व रद्द केल्यानंतर नवे प्रायोजक मिळवण्यास सुरूवातीला अडचणी येतील पण आपल्या देशातही प्रायोजकत्वांची कमी नाही. आपण आपल्या देशावासीयांचा आणि सरकारचा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे सैनिकांचा अभिमान बाळगला पाहिजे. आपले हे सैनिक आपल्यासाठी स्वतःच्या जिव पणास लावतात, असे वाडिया यांनी म्हटले आहे.

कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक षटकार लगावणारे खेळाडू माहित आहेत का? 

चीनची मोबाईल कंपनी अससेले विवो आयपीएलचे प्रमुख प्रायोजक आहेत. दरवर्षासाठी 440 कोटींचा करार केला आहे. 2022 पर्यंत हा करार आहे. पेटीम, स्विगी, ड्रिम इलेव्हन हे सुद्धा आयपीएलचे सहप्रायोजक आहे, या कंपन्या वेगळ्या असल्या तरी त्यामुध्ये चीनची भागीदारी आहे. सरकार जी भूमिका घेईल त्यानुसार आम्ही कार्यवाही करू असे चेन्नई संघानेही सांगितले असल्याचे वाडिया म्हणाले. चीनच्या प्रायोजकांना पर्याय मिळवणे सुरुवातील कठीण जाईल, पण देशासाठी आपण हे करु शकतो, असे चेन्नई संघाच्या सुत्रांचे म्हणणे आहे. अगोदर सरकारला निर्णय घेऊ द्या, सरकारच्या निर्णयाचे आम्ही पालन करू, असे आणखी एका फ्रँचाईसकडून सांगण्यात आले.

चेंडूला चमकवण्यासाठी आयसीसीने दुसरा पर्याय देणं गरजेचे : भुवी

मी अध्यक्ष असतो तर...

सरकारच्या निर्णयापर्यंत आपण वाट कशाला पहायची, इतक्या मोठ्या प्रसंगात देशासोबत रहाण्याची ही आपलीच जबाबदारी आहे.  मी जर बीसीसीआयचा अध्यक्ष असतो तर येत्या मोसमासाठी भारतीय प्रायोजक मिळवा असे मी सहकाऱ्यांना सांगितले असते, असे वाडिया यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या