दुबईतील रग्बी रद्द; आयपीएलचे काय होणार?

संजय घारपुरे
Friday, 31 July 2020

नोव्हेंबरमधील रग्बी लीगसाठी जागतिक संघटना दुबईला सुरक्षित मानत नाही, या परिस्थितीत त्यापूर्वी दोन महिने होणारी आयपीएल किती सुरक्षित असेल, अशी विचारणा होत आहे. अमिराती क्रिकेट मंडळाने आयपीएलचे आयोजन सुरक्षित असल्याचे भारतीय मंडळास कळवले आहे.

मुंबई : संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या आयपीएलची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे; पण त्याच वेळी नोव्हेंबरमध्ये दुबईत होणारी रग्बी सेवन स्पर्धा रद्द झाल्याचा परिणाम आयपीएल संयोजनावर होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यास सुरुवात झाली आहे. पन्नास वर्षांत प्रथमच ही रग्बी रद्द झाल्याने तेथील कोरोनाच्या परिस्थितीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. अमिराती क्रिकेट मंडळ सर्व काही आलबेल असल्याचे चित्र निर्माण करीत असले, तरी अमिरातीत रोज सरासरी तीनशे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ही लीग रद्द करण्यात आली आहे. जागतिक मालिकेतील ही लीग रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तेथील सरकार तसेच आंतरराष्ट्रीय आरोग्य तज्ज्ञांसह चर्चा केली असल्याचे जागतिक रग्बीने सांगितले आहे. ही स्पर्धा 26 ते 28 नोव्हेंबरदरम्यान होणार होती. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

नोव्हेंबरमधील रग्बी लीगसाठी जागतिक संघटना दुबईला सुरक्षित मानत नाही, या परिस्थितीत त्यापूर्वी दोन महिने होणारी आयपीएल किती सुरक्षित असेल, अशी विचारणा होत आहे. अमिराती क्रिकेट मंडळाने आयपीएलचे आयोजन सुरक्षित असल्याचे भारतीय मंडळास कळवले आहे. दुबईतील रग्बी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी अमिराती सरकारबरोबर चर्चा केली असल्याचे जागतिक रग्बीने सांगितले आहे; मात्र आयपीएलच्या आयोजनाबाबत आमची अमिराती सरकारबरोबर सातत्याने चर्चा सुरू आहे. आम्हाला रग्बी स्पर्धा रद्द होण्याचे नेमके कारण माहिती नाही. आयपीएलचे सुरक्षित आणि यशस्वी संयोजन होईल, अशी ग्वाही अमिराती क्रिकेट मंडळाने दिली आहे. 

फिफा झाली मेहरबान ; 211 देशांना देणार आर्थिक सहाय्य

आता खलीज टाइम्सनुसार अमिरातीत 31 जुलैस 283 नवे कोरोना रुग्ण आढळले. तेथील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 60 हजार 506 आहे. त्यातील 53 हजार 909 बरे झाले आहेत, तर एकंदर 351 जणांचे निधन झाले आहे. तिथे कोरोना रुग्ण जाणून घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेतली जात आहे. या प्रकारची पद्धत अंमलात आणणारा अमिराती हा जगातील एकमेव देश आहे. दरम्यान, अबू धाबी, दुबई आणि शारजाहून भारतासाठी विमानसेवा सुरू झाली आहे.


​ ​

संबंधित बातम्या