IPL 2020 : मॅच फिक्सिंगचा अड्डा ते आयपीएलची स्पर्धा, चर्चा शारजहा स्टेडियमची!

सुशांत जाधव
Monday, 27 July 2020

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशातील तटस्थ मैदान म्हणून शारजहाला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले होते.

पुणे : यंदाच्या वर्षातील आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे.  अमिरात क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयचे अधिकृत पत्र मिळाल्याचे स्पष्ट केले. 51 दिवसांच्या वेळापत्रकात एका दिवसात कमीत किमी सामने खेळवले जातील. सात आठवडे स्पर्धा रंगणार असल्यामुळे आठवड्यातील पाच दिवस दोन सामने खेळवणे शक्य होईल, असेही अमिरात क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. संयुक्त अमीरातमध्ये असलेल्या प्रमुख मैदानापैकी शारजहाचे मैदान हे एक आहे.  दुबईपासून अवघ्या 15 किमी अंतरावर असलेल्या शारजाह स्टेडियमची उभारणी ही 80 च्या दशकात व्यावसायिक अब्दुल रहमान बुखातिर यांनी केली. 

आता 'या' देशांचे खेळाडूही आयपीएलच्या सुरुवातीस मुकणार? 

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशातील तटस्थ मैदान म्हणून शारजहाला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले होते. भारत-पाकिस्तानसह चार देशांच्या एकदिवसीय मालिकेला या मैदानात सुरुवात करण्यात आली होती. भारत-पाक यांच्यातील लढतीने शारजहा चषकाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. वर्षातून किंवा दोन वर्षांतून एकदा होणाऱ्या शाहरजहा चषकाची क्रिकेट प्रमी आतूरतेने वाट पाहायचे. 1984-2000 दरम्यान या मैदानात रंगणारी स्पर्धा चांगलीच लोकप्रिय ठरली. त्यानंतर या मैदानाकडे फिक्सिंगचा अड्डा म्हणून पाहण्यात आले. परिणामी 2003-2010 दरम्यान या मैदानात एकही आंतरराष्टीय सामना झाला नाही. 

गुड न्यूज...इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेट सामन्यात प्रेक्षकांची उपस्थिती

2009 मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकन क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. या प्रकारानंतर पाकिस्तानमध्ये दौऱ्यासाठी जाण्यास कोणताही संघ राजी होत नव्हता. या घटनेच्या दोन वर्षानंतर म्हणजे 2011 मध्ये श्रीलंका संयुक्त अरब अमिरातमध्ये पाकिस्तानसोबत खेळण्यास तयार झाले. युएईत रंगलेल्या कसोटी मालिकेतील भारत-श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना शारजहाच्या मैदानात खेळवण्यात आला होता. 2014 मध्ये देखील आयपीएल स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने युएईत रंगले होते यावेळी शारजहाच्या मैदानात काही सामने खेळवण्यात आले होते. 

श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूकडून सौरव गांगुलीचे तोंडभर कौतूक

2014 मध्ये रंगलेले सामने आणि त्याचा निकाल
*दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (बंगळुरु 8 गडी राखून विजयी) 
*राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (पंजाबचा 7 गडी राखून विजय) 
*किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (पंजाब 72 धावांनी विजय) 
*रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (कोलकाता दोन धावांनी विजयी) 
*दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई (दिल्ली 6 गडी राखून विजय)  
*सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (चेन्नई 5 गडी राखून विजयी)  


​ ​

संबंधित बातम्या