ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंपाठोपाठ आफ्रिकन्सच्या सहभागाचा प्रश्न

संजय घारपुरे
Saturday, 25 July 2020

एबी डिव्हिलियर्स, क्विंटॉन डी कॉक यांच्यासह दहा खेळाडू आयपीएलसाठी करारबद्ध आहेत

मुंबई : ऑस्ट्रेलियन्स क्रिकेटपटूंच्या आयपीएलमधील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेटपटू खेळू शकतील का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाची साथ गंभीर होत असल्याने तेथील निर्बंध कडक होत आहेत.  आयपीएलच्या कालावधीत ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग होत आहे. त्यामुळे तेथील खेळाडू काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.

रोनाल्डोपेक्षा जास्त गोल; अन् तो मेस्सी नव्हे

आता क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आपल्या खेळाडूंच्या सहभागास हिरवा कंदील दाखवला आहे; पण तेथील दहा खेळाडूंच्या प्रवासाचा प्रश्न गंभीर आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याने आंतरराष्ट्रीय उड्डाणे पूर्णपणे बंद आहेत. देशाच्या सीमा पूर्ण बंद असल्याने दक्षिण आफ्रिकेतील खेळाडू कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये कसे सहभागी होऊ शकतील, अशी विचारणा होत आहे. आफ्रिकेतील इमरान ताहीर, कॉलिन इनग्रामसह सहा खेळाडू या कॅरेबियन लीगसाठी करारबद्ध आहेत. 

हार्दिक-नताशाच्या फोटोवर चहल-राहुल जोडीची 'लव्हली' रिअ‍ॅक्शन

एबी डिव्हिलियर्स, क्विंटॉन डी कॉक यांच्यासह दहा खेळाडू आयपीएलसाठी करारबद्ध आहेत; पण सध्या आफ्रिकेतील कोरोनारुग्णांची संख्या सुमारे सव्वा चार लाख आहे आणि तिथे 6 हजार 300 जणांचे त्यामुळे निधन झाले आहे. त्यामुळे परदेश प्रवासावरील निर्बंध कठोर आहेत. या परिस्थितीत चार्टर प्लेनची व्यवस्था केल्यासच हे खेळाडू आयपीएलसाठी येऊ शकतील. चेन्नई सुपर किंग्ज तसेच रॉयल चॅलेंजर्स संघात प्रत्येकी 3-3 खेळाडू असून मुंबई इंडियन्स संघात दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंवरील एकंदर खरेदी रक्कम 34.6 कोटी इतकी आहे.


​ ​

संबंधित बातम्या