#IPL2020 : टाईमटेबल बदलल्याचा फायदा राजस्थान रॉयल्सला; दोन होम ग्राउंडचं गिफ्ट!

टीम ई-सकाळ
Thursday, 27 February 2020

राजस्थानची टीम ५ एप्रिलला गुवाहाटीच्या मैदानावर दिल्ली कॅपीटलशी दोन हात करणार आहे. तर ९ एप्रिलला दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत असेल.

IPL 2020 : जयपूर : आयपीएल २०२०च्या थराराला सुरवात होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्याआधीच सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयने केली. तसेच नवे वेळापत्रकही जाहीर केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजस्तान रॉयल्स या टीमचे वेळापत्रकात बरेच बदल करण्यात आले आहेत. मात्र, तरीही या बदलामुळे राजस्थानची टीम आनंदात आहे. कारण त्यांना दोन शहरांमध्ये घरच्या मैदानाचा फील घेण्याची संधी मिळणार आहे. आसाममधील गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सचे दोन सामने खेळविले जाणार आहेत. गुवाहाटीतील बरसापाडा या स्टेडियमवर हे सामने होणार असून उर्वरित सगळे सामने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियनमवर होणार आहेत.

- Video : 'कॅप्टन कूल' धोनी वळाला सेंद्रीय शेतीकडे!

राजस्थानची टीम ५ एप्रिलला गुवाहाटीच्या मैदानावर दिल्ली कॅपीटलशी दोन हात करणार आहे. तर ९ एप्रिलला दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत असेल. राजस्थान रॉयल्सने या वेळापत्रकाबाबत म्हटले आहे की, आसाममध्ये मारवाडी लोक मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यामुळे नवीन वेळापत्रकानुसार दोन सामने तेथे होणार आहेत. त्याचा फायदा आम्हाला निश्चित होईल, कारण आमच्या टीमला चिअर्स करण्यासाठी फॅन्स मोठ्या संख्येने उपलब्ध असतील.

- Women's T20 World Cup : वय 16, पहिला वर्ल्डकप अन् केला 'हा' खतरनाक रेकॉर्ड 

टाईमटेबलमधील बदलासाठी राजस्थान रॉयल्सच्या टीमने आयपीएलच्या गर्व्हनिंग कौन्सिलचे आभार मानले. बीसीसीआयने यावेळी शनिवारी होणारे दोन सामने कमी केले आहेत. त्यामुळे अर्थातच आयपीएल सिझनच्या दिवसांत भर पडून त्याचे वेळापत्रक लांबले आहे. रविवारीच दोन सामने होतील. पहिला सामना दुपारी ४ वाजता तर दुसरा सामना रात्री आठ वाजता होईल. यंदा भरविण्यात येणारा हा आयपीएलचा तेरावा सिझन आहे.

- INDvsNZ : रहाणे म्हणतो, 'आता बघाच काय करतो ते'


​ ​

संबंधित बातम्या