टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धांच्या तारखा निश्चित करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

मागच्या महिन्यात अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता कालावधी 29 जून पर्यंत निश्चीत केला होता.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रभावामुळे जगभरातील क्रीडा आयोजने धोक्यात आली आहेत, माहामारीचा धोका लक्षात घेऊन बऱ्याच प्रतिष्ठीत स्पर्धा स्थगीत करण्यात आल्या आहेत. यादरम्यन अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) ने जगभरातील सर्व अंतरराष्ट्रीय महासंघाना टोकियो ऑलिम्पिक पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धांसाठी तारखा निश्चीत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच समितीने भविष्यात संभावित शक्यतांसाठी तसेच आपत्कालीन नियोजनासाठी योजना आखण्यासाठी मदत देखील मागीतली आहे. 

मागच्या महिन्यात अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता कालावधी 29 जून पर्यंत निश्चीत केला होता. कोरोना व्हायरसमुळे यावर्षी नियोजित असलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षीने पुढे ढकलण्यात आली आहे. 

 “अंतराष्ट्रीय महासंघाकडे स्पर्धांच्या नियोजनात अनिश्चीतता असल्याने स्पर्धांच्या तारखा अद्याप निश्चीत करण्यात आलेल्या नाहीत, त्या तारखा अंतराष्ट्रीय महासंघ निश्चीत करेल आणि त्यासंबंधीच्या सुचना आयओसी ला दिल्या जातील.” येत्या जुलै पर्यंत पात्रता स्पर्धा आयोजन वेळापत्रक तयार होईल असे आयओसी’ने सांगीतले. “आमची इच्छा आहे की जुलै महिन्यात जगभरातील परिस्थीतीचा आढवा घेत तयार योजना सर्वांसमोर ठेवण्यात येईल” असे ‘आयओसी’ने म्हटले आहे.


​ ​

संबंधित बातम्या