INDvsWI : पदार्पणात 'नवदीप' कामगिरी; घेतल्या महत्त्वाच्या विकेट!

टीम ई-सकाळ
Sunday, 22 December 2019

पदार्पणाच्या सामन्यात अविस्मरणीय कामगिरी करू शकला नसला, तरी अत्यंत महत्त्वाच्या विकेट सैनीने घेतल्या.

कटक : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये खेळला जात आहे. चेन्नई आणि विशाखापट्टणममध्ये प्रत्येकी 1-1 सामना जिंकत दोन्ही संघांनी मालिका विजयाचा सस्पेन्स तिसऱ्या सामन्यावर ढकलला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाठीच्या दुखापतीमुळे दीपक चहरला संघाबाहेर जावे लागल्याने त्याच्या जागी नवखा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला स्थान देण्यात आलं. या सामन्याद्वारे सैनीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं आहे. तो भारताचा 229 वा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे.

- INDvsWI : पूरन-पोलार्डच्या फटकेबाजीमुळे विंडीजची 315 पर्यंत मजल!

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला सामना खेळत असणाऱ्या सैनीने आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवली. विंडीजच्या तुफानी फलंदाज शिमरॉन हेटमायरला त्याने आपला बळी ठरवला. सैनीला उंच फटका मारण्याच्या नादात हेटमायर कुलदीप यादवकडे झेल देऊन माघारी परतला. तर दुसरीकडे एका जोरदार यॉर्करवर सैनीने चेसची दांडी गुल केली. 

- टीम इंडियासाठी तयार होतोय 'The Wall Jr'

पदार्पणाच्या सामन्यात अविस्मरणीय कामगिरी करू शकला नसला, तरी अत्यंत महत्त्वाच्या विकेट सैनीने घेतल्या. 10 षटके टाकताना 58 धावांच्या मोबदल्यात त्याने 2 विकेट घेतल्या.

- Kai Po Che ते IPL : बघा दिग्विजय देशमुखचा स्वप्नवत प्रवास!

नवदीप सैनीविषयी :

नवदीपचा जन्म हरयाणाच्या करनाल या गावी झाला. पण तो प्रथण श्रेणी क्रिकेट पहिल्यापासून दिल्ली संघाकडून खेळत आला आहे. सैनीने प्रथम श्रेणीमध्ये 125, भारत अ संघातर्फे 75 आणि टी-20 मध्ये 36 बळी मिळवले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या