INDvsSA : अश्विन @350; फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी केली बरोबरी

वृत्तसंस्था
Sunday, 6 October 2019

कुंबळेंनी 77 कसोटींमध्ये 350 बळी घेतले होते. नोव्हेंबर 2017 मध्ये अश्विनने 300 कसोटी बळींचा टप्पा गाठणारा वेगवान गोलंदाज ठरला होता.

विशाखापट्टणम : येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावल्यानंतर गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत आफ्रिकेच्या खेळाडूंना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. 

re>

दोन्ही डावांत आठ विकेट घेणाऱ्या आर. अश्विनने विजयात सिंहाचा वाटा उचलला. अश्विनने 66 व्या कसोटी सामन्यात 350 बळी मिळवत श्रीलंकेचा जगप्रसिद्ध फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या पराक्रमाशी बरोबरी केली.

थेनूस डी-ब्रूनचा बळी घेत अश्विनने मुरलीधरनच्या कामगिरीशी बरोबरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये कमी सामन्यांत 350 बळींचा टप्पा गाठणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन आता मुरलीधरनशी संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे. या दोघांनीही 66 कसोटी सामन्यांत हा पराक्रम केला आहे. 

तर दुसरीकडे भारतीय गोलंदाजांच्या यादीत अश्विन आता अव्वलस्थानी पोहोचला असून त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना मागे टाकले आहे. कुंबळेंनी 77 कसोटींमध्ये 350 बळी घेतले होते. नोव्हेंबर 2017 मध्ये अश्विनने 300 कसोटी बळींचा टप्पा गाठणारा वेगवान गोलंदाज ठरला होता.

याआधी न्यूझीलंडच्या सर रिचर्ड हॅडली आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन यांनी 69 सामन्यांत, तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डेनिस लिलीने 70 सामन्यांत 350 बळी घेतले आहेत.  

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- InvdiavsSA : आफ्रिकेचं शेपूट वळवळलं; भारताचा पहिल्या कसोटीत दणदणीत विजय

- INDvsSA : शर्माजी का बेटा छा गया! सर ब्रॅडमनांनाही टाकले मागे

- विश्वविजेता कुस्तीपटू राहुल आवारे बांधणार प्रशिक्षकांच्या मुलीशी लग्नगाठ


​ ​

संबंधित बातम्या