#INDvsENG 'या' प्रमुख गोलंदाजाशिवाय भारताला खेळावे लागणार दुसऱ्या कसोटीत

वृत्तसंस्था
Wednesday, 8 August 2018

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाला लागलेले खेळाडूंच्या दुखापतीचे ग्रहण सुटत नाही. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा दुसऱ्या कसोटी सामन्यात सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाला लागलेले खेळाडूंच्या दुखापतीचे ग्रहण सुटत नाही. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा दुसऱ्या कसोटी सामन्यात सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आर्यलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात अंगठ्याला झालेले फ्रॅक्चर अद्याप ठीक झाले नसल्याने तो या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचे भारतीय संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी तंदुरुस्त असल्यास बुमरा दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध राहील असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. मात्र अद्यापही तो 100 टक्के तंदुरुस्त नसल्याने दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही.

याविषयी भारतीय गोलंदाज प्रशिक्षक भारत अरुण म्हणाले, ‘बुमरा गोलंदाजी करण्यास तंदुरुस्त आहे. परंतु, त्याला आता सामन्यात खेळविणे घाईचे ठरेल. सर्वप्रथम त्याच्या हातावरील प्लास्टर काढावे लागेल आणि म्हणूनच तो दुसरा कसोटी सामना खेळणार नाही.’ 

बुमरा रोज इतर सहकाऱ्यांसह नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करतो. मात्र, झेल घेताना तो अजूनही सॉफ्ट चेंडूचा वापर करत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना 9 ऑगस्टला लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे.

संबंधित बातम्या