क्रिकेटच्या बायबलमध्ये `या` भाषेचा सन्मान

शैलेश नागवेकर
Saturday, 25 July 2020

माजी पंच रिसोडकर यांनी भाषांतरीत केलेल्या नियमांना स्थान

इंदूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी क्रिकेट नियम तयार करणाऱ्या  मेरिलबोन क्रिकेट क्लबला  (एमसीसी) क्रिकेटचे बायबल समजले जाते या बायबलमध्ये आता हिंदी भाषा सन्मानाने झळकणार आहे. भारतीय क्रिकेटमधील माजी पंच राजीव रिसोडकर यांनी क्रिकेटच्या सर्व नियमांचे हिंदीत भाषांतर केले आहे आणि हे नियम मेरिलबोर्न क्रिकेट क्लबच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेबरोबर सर्व भारतीयांसाही ही अभिमानाची बाब आहे. एमसीसीच्या 2019 मधील दुसऱ्या आवृत्तीत हिंदीत भाषांतरीत केलेल्या नियमांना स्वतंत्र स्थान आहे. हे भाषांतर रिसोडकर यांनी केले आहे, असे मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सचिव संजीव राव यांनी सांगितले.

कोरोना बचावासाठी क्रीडा प्राधिकारणाचा 'रंगीत' उपाय

58 वर्षीय रिसोडकर हे बीसीसीआयचे पंच होते 1997-2016 या काळात त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पंचगिरी केलेली आहे. बीसीसीआयच्या लेव्हल ३ पंच प्रशिक्षणात ते दोन दशके काम करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पंच तयार झाले आहेत. पारंपरिकरित्या क्रिकेटचे सर्व नियम इंग्रजीत असतात बीसीसीआयने केलेल्या सुचनेनुसार मी या सर्व नियमांचे हिंदीत भाषांतर केले त्यामुळे हे नियम जास्तीत जास्त लोकांना सहजपणे समजणे सोपे जाईल, असे रिसोडर यांनी सांगितले. एका महिन्यात आपण हे भाषांतर पूर्ण केले असल्याचे ते म्हणाले.

काय आहे एमसीसी
लॉर्डस येथील मेरिलबोर्न क्रिकेट क्लब (एमसीसी) 1787 मध्ये स्थापन झालेला आहे. आयसीसीचे सर्व नियम तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.


​ ​

संबंधित बातम्या