भारतासाठी सलग दोन सामने हे कसले आले नियोजन?

वृत्तसंस्था
Monday, 17 September 2018

भारतीय क्रिकेटची नवी मोहीम केवळ आशिया करंडक जिंकण्यासाठीच नव्हे; तर इंग्लंड दौऱ्यातील पराभवामुळे पाठीराख्यांचा गमावलेला विश्‍वास पुन्हा मिळवण्यासाठी सुरू होत आहे. सर्वाधिक प्रतिष्ठेच्या इंग्लंड दौऱ्यात मानहानी झाली. आता आशिया करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी झाली तर भारतीय क्रिकेटच्या पाठीमागे नेहमीच उभे राहणाऱ्या पाठीराख्यांनाही दिलासा मिळेल.
 
पाकिस्तानविरुद्ध चार हात करण्यापूर्वी होणारा हॉंगकॉंगविरुद्धचा सामना तयारीसाठी महत्त्वाचा असेल. पाकिस्तानविरुद्धचा दुसरा सामना असताना आयोजकांनी भारतासाठी सलग दोन दिवसांत दोन सामने कसे आयोजित केले, हा प्रश्‍न समजण्याच्या पलीकडचा आहे. अमिराती संघाला पराभूत करून हॉंगकॉंगने आशिया स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली. सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने त्यांचा सहज पराभव केला. आता हाच संघ भारताविरुद्ध कामगिरीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

भारतीय संघ अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात प्रभावीपणे खेळणारा रोहित शर्मा येथे दोन-एक शतके करण्यास प्रयत्नशील असेल. कठीण परिस्थितीत त्याला सल्ला देण्यासाठी अनुभवी धोनी असेल. धोनीच्या अनुभवाची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. संघातील तरुण फिरकी गोलंदाजांना त्याच्या अनुभवाचा फारच मोठा फायदा होत आहे. 

भारतीय फलंदाजी ही विविधतेमुळे नेहमीच "स्टार ऍट्रॅक्‍शन' असते, आता गोलंदाजीही तेवढीच सक्षम होत आहे. मात्र, त्यांची एकत्रित कामगिरी कशी होती याकडे लक्ष असेल. यजुवेंदर चहल आणि कुलदीप यादव यांची वेगवेगळ्या पद्धतीने विकेट घेण्याची आणि एकमेकांना पूरक अशी कामगिरी करण्याची क्षमता 70 च्या दशकातील आपल्या फिरकी गोलंदाजांची आठवण करून देणारी आहे. 

हॉंगकॉंगविरुद्धच्या सामन्यात भारताचा प्रथम फलंदाजी करण्यावर भर असल्यामुळे सर्व फलंदाजांना आणि प्रामुख्याने मधल्या फळीतील फलंदाजांना सराव; तसेच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कोणाला संधी द्यायची याची तयारीही करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विराट कोहलीच्या तुलनेत रोहित शर्माला नाणेफेकीत दैव साथ देते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

​ ​

संबंधित बातम्या