डेविस कप मधील भारताचा फिनलंड विरुद्धचा सामना स्थगित

टीम ई-सकाळ
Saturday, 27 June 2020

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आईटीएफ) यावर्षीच्या अखेरीस नोव्हेंबर मध्ये खेळवण्यात येणाऱ्या डेविस कप फायनल्स समवेत इतर सामने देखील स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फिनलंड सोबत होणार भारतीय संघाचा डेविस कप सामना देखील पुढील वर्षापर्यंत स्थगित झालेला आहे. वल्ड ग्रुप १ मध्ये भारतीय टेनिस संघाला यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात फिनलंड विरुद्ध सामने खेळायचे होते.  

कोरोनामुळे आता टेनिस जगतातील 'ही' स्पर्धा स्थगित 

सर्बिया आणि क्रोएिशया येथे आयोजित करण्यात आलेल्या एड्रिया टूर स्पर्धेतील सामन्यांच्या दरम्यान, जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविच सह अन्य खेळाडू कोरोना संक्रमित आढळले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून आईटीएफने खेळाडूंची सुरक्षा महत्वपूर्ण असल्याचे सांगत, डेविस कप फायनल्स सह अन्य सामने पुढे ढकलत असल्याचे म्हटले आहे. आईटीएफने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, काही दिवसांपासून निर्माण झालेल्या तार्किक व नियामक आव्हानांचा आढावा घेतला असल्यामुळे यंदा वर्ल्ड ग्रुप १ आणि वर्ल्ड ग्रुप 2 यांच्यातील सर्वच सामन्यांना स्थगिती देत असल्याचे म्हटले आहे.

...म्हणून विराट, रोहित अन् धोनीला अभूतपूर्व यश मिळालं : हार्दिक पांड्या         
     
दरम्यान, यंदा कोरोनाच्या आजारामुळे अभूतपूर्व संकट खेळ जगतावर कोसळले आहे. यापूर्वी एटीपी आणि डब्ल्यूटीए टूर सामन्यांचे आयोजन रद्द अथवा स्थित करण्यात आले आहेत. तर जगविख्यात विम्बलडन स्पर्धा दुसऱ्या विश्वयुद्धानंतर प्रथमच रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर यावेळेस ओढवली. यापूर्वी भारताने डेविस कप पात्रता फेरीत क्रोएशियाला ३ - १ ने पराभूत केले होते. तर फिनलंडने वर्ल्ड ग्रुपच्या प्लेऑफमध्ये मेक्सिकोला ३ - २ ने हरवले होते. त्यामुळे भारताचा फिनलंड सोबतच आगामी सामना सोपा ठरणार होता. फिनलंडच्या संघातील एमिल रुसूवुरी हा खेळाडू वगळता इतर कोणीही खेळाडू जागतिक क्रमवारीत पहिल्या ४०० मध्ये नाही.

​ ​

संबंधित बातम्या