भारताचे क्रिकेट अनलॉक आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेने?

संजय घारपुरे
Wednesday, 22 July 2020

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात संयुक्त अरब अमीरातीत एकदिवसीय मालिका होण्याची शक्यता आहे. आयपीएलपूर्वी ही मालिका घेण्याचा विचार सुरु आहे. 

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात संयुक्त अरब अमीरातीत एकदिवसीय मालिका होण्याची शक्यता आहे. आयपीएलपूर्वी ही मालिका घेण्याचा विचार सुरु आहे. 

बीसीसीआयच्या आर्थिक पाठबळामुळेच हरभजन सिंगची 'त्या' प्रकरणातून सुटका  

आयपीएल अमीरातीत घेण्याची चर्चा सुरु झाल्यानंतर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने अमीरातीमधील मालिकेचा प्रस्ताव भारतीय मंडळास दिला आहे. यजमान देशास मालिका प्रसारणाचे आधिकार असतात. आता भारत तसेच दक्षिण आफ्रिकेचा प्रसारणाचा करार स्टार स्पोर्ट्सकडे असल्यामुळे त्या मालिकेच्या प्रसारणातही कोणतेही प्रश्न येणार नाहीत. असा विचार होत आहे. 

भारतीय क्रिकेट संघ तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑगस्टमध्ये आफ्रिकेस जाणार असल्याची चर्चा होती. ही मालिका न झाल्यास क्रिकेट दक्षिण आफ्रिकेस एक कोटी अमेरिकन डॉलरचा फटका बसेल, असे आफ्रिकेतील क्रिकेट पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. 

ऑलिंपिक लांबले, परदेशी कोचनाही मुदतवाढ

भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सध्या आमचे लक्ष आयपीएलच्या संयोजनाकडे आहे. आयपीएल निश्चित झाल्यावर अन्य मालिकांबाबत विचार करता येईल. ही मालिका घेतानाही सर्व प्रश्न विचारात घेणे आवश्यक आहे, असेही भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या